ROHIT SHARMA | रोहित शर्माचा ‘ट्रान्स्फॉर्मेशन’ लूक व्हायरल

रांची : प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेच्या निमित्ताने रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या गतवैभवाची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहेच. मात्र, त्याने घटवलेले वजन आश्चर्याचा धक्का देणारे ठरते आहे. फिटनेसच्या आघाडीवर आपण अद्यापही आणखी परिश्रम घेत आहे, हेच त्याने जणू यातून दर्शवले आहे.

चाळिशीच्या समीप असताना अतिरिक्त वजन कमी करून रोहितने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रांची येथे वॉर्म-अप आणि प्रशिक्षण घेताना त्याची छायाचित्रे बरीच व्हायरल झाली. त्याच्या या फिटनेसमधील फरक पाहता वन डे क्रिकेटमध्ये दीर्घ काळ खेळत राहण्याचा त्याचा विचार असावा, असेही संकेत आहेत. रोहित 2027 वन डे विश्वचषकात खेळू इच्छितो, अशी चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियातील मालिकेत रोहितने लक्षवेधी कामगिरी बजावली. सिडनीमध्ये त्याने विराट कोहलीसोबतच्या आयकॉनिक स्टँडमध्ये शतक झळकावले. यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ सन्मानही मिळाला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तोच धडाका कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

2025-11-29T17:02:48Z