SURYAKUMAR YADAV : आयपीएलमध्ये खेळणार नाही सूर्या? मुख्य कोचच्या वक्तव्याने खळबळ

Suryakumar Yadav in IPL : उद्यापासून म्हणजेच 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी सर्वांचं लक्ष मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमकडे असणार आहे. गेल्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमची फार खराब कामगिरी पहायला मिळाली. त्यामुळे यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम आयपीएल जिंकणार का हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. मात्र सध्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फॉर्म पाहता त्याला खेळण्याची संधी मिळणार का? याबाबत कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी मोठं विधान केलं आहे.

उद्यापासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीगला सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये पहिल्या 2 सिझनप्रमाणे 10 टीम्स असणार आहेत. यंदाचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमच्या कर्णधाराची आणि कोचची प्रेस कॉन्फर्न्स घेण्यात आली.

सूर्यकुमार आयपीएल नाही खेळणार?

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये पूर्णपणे फेल गेलेला दिसला. तीन सामन्यांच्या या सिरीजमध्ये सूर्याला एकाही सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं मॅनेजमेंट सूर्याला खेळवणार की नाही याबाबतंही चर्चा सुरु आहे. 

मात्र यामध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य कोच मार्क बाऊचरने याबाबत विधान केलं आहे. बाऊचर म्हणाले, पहिला बॉल तो कसा खेळतोय यावरून कोणत्याही खेळाडूचा फॉर्म ठरवता येत नाही. मुख्य कोच बाउचर यांच्या या विधानाने त्यांनी सूर्यकुमारची बाजू घेतल्याचं मात्र स्पष्ट होतंय.

बाऊचर पुढे म्हणाले की, सूर्याचं ठीक आहे. मी सूर्यकुमारशी चर्चा केली आहे. यावेळी त्याने मला मी खूप चांगल्या पद्धतीने बॉल मारू शकतो. 

अर्जुन तेंडुलकरचा होणार डेब्यू?

गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स टीममध्ये आहे. मात्र त्याला अद्याप प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आयपीएलच्या 16 व्या सिझनमध्ये अर्जुन तेंजुलक खेळण्याची शक्यता आहे. अर्जुनबाबत बोलताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, गेल्या काही दिवसांमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगला खेळ केला. मात्र त्याला दुखापत झाली होती. मात्र आता तो गोलंदाजीला सुरुवात करणार आहे.

2023-03-30T11:39:05Z dg43tfdfdgfd