VIDEO : एजबेस्टन कसोटीत रवींद्र जडेजाने केली अशी चूक, पंचांनी दिली वॉर्निंग; तर इंग्लिश खेळाडू भिडले

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव 587 धावांवर आटोपला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिल, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगली खेळी केली. शुबमन गिलने 387 चेंडूंचा सामना करत 269 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 89, यशस्वी जयस्वालने 87, तर वॉशिंग्टन सुंदर याने 42 धावांची खेळी केली. या चौघांच्या खेळी आणि भागीदारीमुळे भारताला 587 धावांपर्यंत मजल मारता आली. रवींद्र जडेजाचं शतक 89 धावांनी हुकलं. शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा यांच्यात 203 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. ही भागीदारी इंग्लंडसाठी खूपच डोकेदुखी ठरली. असं असताना दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेडाची इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्ससोबत वाद झाला. रवींद्र जडेजा फलंदाजी करताना डेंजर स्पॉट असलेल्या जागी धावल्याने झाला.

भारताच्या पहिल्या डावातील 87व्या षटकात जडेजाने ऑफ साईडवर ख्रिस वोक्सचा दुसरा चेंडू खेळला. यावेळी त्याने धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. पण शुबमन गिलने धाव घेण्यास नकार दिला. पण पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी मैदानावरील पंच शराफुद्दौला यांनी रवींद्र जडेजा इशारा दिला. कारण खेळपट्टी खराब होण्याचा धोका आहे.

रवींद्र जडेजा पुन्हा धाव घेत असताना डेंजर स्पॉटवर पाऊल पडलं. तेव्हा इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स आणि गोलंदाज ख्रिस वोक्स यांचा संताप झाल. जडेजा पुन्हा डेंजर स्पॉटवर का धावला याबद्दल वोक्सने राग व्यक्त केला. वोक्सने रागाच्या भरातच जडेजाकडे पाहिले. पण जडेजाने तो एका बाजूला असल्याचे दाखवून दिले आणि त्याने डेंजर स्पॉटवर पाऊल ठेवले नसल्याचं सांगितलं.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात दिलेल्या 587 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला डाव गडगडला. सुरुवातीला इंग्लंडला दोन धक्के बसले. बेन डकेट आणि ओली पोप यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. आकाश दीपने या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. भारताने इंग्लंडला 387 धावांच्या आत रोखलं तर इंग्लंडवर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल.

2025-07-03T16:53:08Z