VIRAL VIDEO: हसावं की रडावं! रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करायला गेला अन् थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला

Viral Video: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) चाहते एका देश किंवा पिढीपुरते मर्यादित नाही. संपूर्ण देशभरात रोनाल्डोचे चाहते असून त्याच्या सेलिब्रेशनची स्टाइलही चाहत्यांना प्रचंड आवडते. अनेक तरुण फुटबॉलपटूंसाठी रोनाल्डो आदर्श असून त्याच्या पावलावर पाऊल टाकत आपणही एक महान फुटबॉलपटू व्हावं असं त्यांचं स्वप्न असतं. यामुळे फुटबॉलपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत अनेक खेळाडू त्याच्या सेलिब्रेशनची स्टाइल कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशाच प्रकारे सेलिब्रेशन करणं व्हिएतनामच्या एका फुटबॉलपटूला चांगलंच महागात पडलं आहे. त्याला थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. 

रोनाल्डोने 2013 मध्ये चेल्सीविरोधातील सामन्यात गोल केल्यानंतर siuuu सेलिब्रेशन केलं होतं. त्याच्या सेलिब्रेशनची ही स्टाइल जगभरात प्रसिद्ध झाली आणि अनेकजण ती कॉपी करु लागले. दरम्यान व्हिएनतामनच्या एका खेळाडूने रोनाल्डोप्रमाणे सेलिब्रेशन करण्याच्या नादात थेट हॉस्पिटल गाठलं आहे. त्याचा मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Viettel FC चा खेळाडू  Tran Hong Kien याने गोल केल्यानंतर बायलाइनच्या दिशेने धाव घेतली आणि रोनाल्डोला कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्याने स्वत:ला जखमी करुन घेतलं. Tran Hong Kien ने चुकीच्या पद्धतीने उडी मारल्याने त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. 

मैदानावर त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर त्याने रोनाल्डोचं "peace of mind" सेलिब्रेशन केलं. 2021-22 मध्ये मॅनचेस्टर युनायटेड विरोधातील सामन्यात रोनाल्डोने हे सेलिब्रेशन केलं होंत. पण काही वेळाने तो लंगडू लागला आणि अखेर स्ट्रेचरच्या सहाय्याने मैदानाबाहेर नेण्यात आलं. 

2023-03-25T13:06:31Z dg43tfdfdgfd