WORLD CUP 2023: वनडे वर्ल्ड कपचा एकही सामना 'या' स्टेडियमवर होणार नाही; पाहा काय आहे कारण?

ODI World Cup 2023 Venue List: यंदाच्या आयसीसी वनडे वर्ल्डकपचं (ODI World Cup 2023) आयोजन भारतात केलं जाणार आहे. यासाठी भारताने पूर्णपणे तयार केली. मात्र यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, भारतातील मोहालीच्या स्टेडियममध्ये (Mohali stadium) एकंही सामना खेळवण्यात येणार नाहीये. याठिकाणी कंस्ट्रक्शनचं काम सुरु असल्याने या स्टेडियमला वेन्यूमधून हटवण्यात आलं. 

वनडे वर्ल्डकप 2023 चे सर्व सामने यावेळी भारतामध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी देशातील 12 शहरांची निवड करण्यात आली असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येणार आहे. 

मोहालीच्या स्टेडियममध्ये एकंही सामना नाही

पंजाबमधील मोहाली स्टेडियममध्ये यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामना खेळवण्यात येणार नाहीये. मुख्य म्हणजे, या स्टेडियममध्ये 2011 साली भारत आणि पाकिस्तान वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा उपांत्य सामना खेळवण्यात आला होता. 

2016 च्या T20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील साखळी सामनाही देखील या स्टेडियममध्ये झाला होता. इतके महत्त्वाचे सामने या स्टेडियममध्ये होऊन देकील यंदाच्या वर्ल्डकपसाछी मोहालीला शॉर्टलिस्ट न करणं हा मोठा निर्णय आहे. 

क्रिकेट ट्रॅकरने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर कदाचित एकही सामना खेळला जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये सुरु असलेल्या बांधकामामुळे इथे सामना खेळवला जाणार नाही. दरम्यान याबाबत अजून बीसीसीआयने अधिकृतरित्या काहीही माहिती दिलेली नाही. 

कधी पासून सुरु होणार वर्ल्डकप?

ईएसपीएन क्रिकइंफोच्या एका रिपोर्टप्रमाणे, यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup) 5 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती आहे. तर 2023 च्या वनडे वर्ल्डकपचा फायनल (World Cup Final) 19 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. 

या शहरांमध्ये रंगणार सामने

वनडे वर्ल्ड कपमध्ये 2023 मध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये हे सामने होणार आहे. त्यानुसार हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळूरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहेत. अद्याप याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

2023-03-25T11:51:29Z dg43tfdfdgfd