WPL 2023 : मुंबईने फायनल गाठताच आनंदाने खेळाडूंसोबत नाचल्या NITA AMBANI; डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Nita Ambani Dance Video: महिला प्रिमीयर लीग (WPL 2023) आता शेवटच्या टप्पात आहे. शुक्रवारी एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सच्या टीमचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. मुंबईने तब्बल 72 रन्सने युपीचा पराभव केला. तर आता फायनलमध्ये मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सच्या टीमशी होणार आहे. दरम्यान पहिल्याच महिला प्रिमीयर लीगच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या महिला चांगल्याच खूश होत्या. यामध्ये टीमच्या मालकीण नीता अंबानी देखील आनंदाच्या मूडमध्ये दिसून आल्या. 

शुक्रवारी युपी वॉरियर्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबईने युपीवर 72 रन्सने विजय मिळवला. पहिल्यांदा फलांदाजी करत मुंबईने युपीसमोर 183 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 110 रन्सवर संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली. 

दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये नीता अंबानींच्या डान्सने सर्वांची मनं जिकंल आहेत. 

हरमनसोबत नाचल्या नीता अंबानी

मुंबई इंडियन्सची कर्णधार हमरनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली टीमने फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर नीता अंबानी यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नीता अंबानी परदेशी खेळांडूंसोबत डान्स करतायत. यानंतर हरमनप्रीत कौरने भांडगा देखील केला. नीता अंबानी यांच्यासोबत झुलन गोस्वामी देखील थिरकताना दिसतेय. 

मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये प्रवेश

भारतात पहिल्यांदात महिला प्रिमीयर लीग खेळवण्यात आली. 26 मार्च म्हणजेच रविवारी या लीगची फायनल रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचं पारड जड मानलं जातंय.

इस्सी वोंगने रचला इतिहास

मुंबई विरूद्ध युपीच्या एलिमिनेटर सामन्यात महिला प्रीमियर लीगमध्ये पहिली हॅट्ट्र्रिक झाली आहे. मुंबई इंडियन्सी इस्सी वोंग ही हॅट्ट्र्रिक घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे. इस्सीने 13व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरवर किरण नवगिरेला बाद करत विकेट काढली. यानंतर इस्सीने तिसर्‍या बॉलवर इस्सी वँगने सिमरन शेखला क्लीन बोल्ड आऊट केलं. तर चौथ्या बॉलवर सोफी एक्लेस्टोनला देखील क्लीन बॉलिंग करून हॅट्रिक पूर्ण केली. या हॅट्रिकने तिने इतिहास रचला आहे.

2023-03-25T13:06:31Z dg43tfdfdgfd