WPL 2023 FINAL ची क्विन 'MUMBAI INDIANS', आकाश - नीता अंबानींसह खेळाडूंचा एकच जल्लोष; VIDEO VIRAL

Nita Ambani Dance Video : पहिल्या महिला प्रीमीयर लीगवर मुंबई इंडियन्सने (mumbai indians wins) आपल्या नावावर कोरला आहे.  मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने (MI vs DC WPL Final) दारुण पराभव केला आहे. मुंबई  इंडियन्सचं मनोबल वाढविण्यासाठी टीमची मालकीण नीता अंबानीसह आकाश अंबानी, श्लोका मेहता अंबानी आणि पृथ्वी अंबानीही आले होते. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या राणींनी कमाल केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने इतिहास रचला. अष्टपैलू खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटने 55 चेंडूत नाबाद 60 धावांची धडाकेबाज खेळी खेळून मुंबईला विजय मिळवून दिला.

या इतिहास विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये फायनल जिंकल्याचा आनंदाचा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दिल्लीचा पराभव करत मुंबईच्या राण्यांनी मैदान गाजवल्यानंतर त्यांनी एकच जल्लोष केला. ज्यावेळी त्यांनी फायनल गाठली होती तेव्हाही त्यांनी धम्माल डान्स केला होता. त्या क्षणाचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Nita Ambani Akash Ambani MI vs DC WPL Final mumbai indians wins players Dance Video viral on Social media prize money details)

कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 39 बॉल्समध्ये 5 फोरच्या मदतीने 37 रन्स करत चांगली धावसंख्या केली. दिल्लीने मुंबईला 132 चं टारगेट दिलं होतं. दिल्लीच्या पोरीही कमाल खेळल्या शिखा पांडे आणि राधा यादव यांनी शेवटच्या विकेटसाठी नाबाद 52 रन्सची पार्टनरशिप केल्यामुळे हा ओव्हर मुंबईला भारी पडू शकतो हे प्रत्येकाला वाटतं होतं. पण मुंबईच्या पोरींनी कमालच केली.

WPL 2023 फायनलचा विजेता मुंबई इंडियन्स ट्रॉफीसह (WPL Price Money) 6 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. अहवालानुसार उपविजेत्या संघाला 3 कोटी रुपये मिळाले. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या UP Warriorz ला 1 रुपये रोख किंमत मिळाली. 

WPL फायनलनंतर पुरस्कारांचे मानकरी : (wpl 2023 prize money details)

पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द मॅच (ट्रॉफी आणि एक लाख रुपये): राधा यादव

सामनावीर (ट्रॉफी आणि 2.5 लाख रुपये): नताली सायव्हर ब्रंट

पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि रु 5 लाख): सोफी डिव्हाईन

हंगामातील उदयोन्मुख खेळाडू (ट्रॉफी आणि 5 लाख रुपये): यास्तिका भाटिया

फेअरप्ले पुरस्कार: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स

कॅच ऑफ द सीझन पुरस्कार (ट्रॉफी आणि 5 लाख रुपये): हरमनप्रीत कौर

एका मोसमात सर्वाधिक विकेटसाठी पर्पल कॅप (कॅप आणि रु 5 लाख): हेली मॅथ्यूज

एका मोसमात सर्वाधिक धावांसाठी ऑरेंज कॅप (कॅप आणि रु 5 लाख): मेग लॅनिंग

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रुपये): हीली मॅथ्यूज

उपविजेता संघ (ट्रॉफी आणि रु. 3 कोटी): दिल्ली कॅपिटल्स

विजेता संघ (ट्रॉफी आणि 6 कोटी रुपये): मुंबई इंडियन्स

2023-03-27T07:22:29Z dg43tfdfdgfd