WPL FINAL : HARMANPREET KAUR च्या वाटेमध्ये पुन्हा तोच अडथळा; फायनल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगणार?

MI vs DC WPL Final : आज पहिल्यांदाच महिला प्रिमीयर लीगचा फायनल (WPL Final) रंगणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. यावेळी दोन्ही टीम पहिली WPL जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत. मात्र यावेळी मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet kaur) वाट्यात पुन्हा एकदा तोच अडथळा समोर आला आहे. इतिहास पाहिला तर या अडथळ्यामुळे 2 वेळा हरमनप्रीतला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकलेत. तर मुंबईने देखील लीगमध्ये 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दोन्ही टीम्सना आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करतेय तर दिल्लीचं मेग लेनिंगकडे आहे.

हरमनच्या वाटेतील अडथळा कोण?

हरमनप्रीत कौरच्या वाटेतील अडथळा दुसरा तिसरा कोणीही नसून मेग लेनिंग आहे. आपण जर इतिहास पाहिला तर दोन वेळा मेग लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या टीमने फायनल सामन्यात भारताचा पराभव केला. या दोन्ही वेळी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर होती. 

दोन वेळा लेनिंगने मोडलं हरमनचं मन

2020 मध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. दरम्यान या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मात दिली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया टीमने लेनिंगच्या नेतृत्वाखाली हरमनप्रीतचं पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न मोडलं होतं. 

यानंतर दुसरी वेळ म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स. भारतीय महिला टीम कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावण्यापासून अवघी एक पाऊल मागे होती. त्यावेळी देखील मेग लेनिंगच्या ऑस्ट्रेलियाने भारताचा हरमनप्रीत कौर आणि इंडिया टीमला ऐतिहासिक विजयापासून लांब ठेवलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात हरमनप्रीत कौर हा वचपा काढणार की, मेग तिच्या वाटेतील अडथळा बनून राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आज मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स

महिला प्रिमीयर लीगची आज फायनल रंगणार असून मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येणार आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा हरमनप्रीत कौर आणि मेग लेनिंग एकमेंकीसमोर येणार आहेत. अशावेळी हरमनप्रीत दोन पराभवांचा बदला घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

2023-03-26T13:22:13Z dg43tfdfdgfd