WPL MAIDEN FINAL TODAY: आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार, कोण मारणार बाजी? MI की DC?

DC vs MI, Final, WPL 2023: क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळल्या जात असलेली महिला प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्यात (WPL maiden final today) पोहोचली आहे. आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना (WPL Final) खेळला जाईल. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोण मारणार बाजी?  मुंबई (MI) की दिल्ली (DC)? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. (WPL maiden final today Delhi Capitals Mumbai Indians set to lock horns where to watch who will win MI or DC know other details)

दोन्ही संघांचा लीगमधील आतापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय राहिलाय. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आधीपासून सर्वांवर प्रभावी राहिला आहे. दिल्ली कॅपिटल्सने 6 विजय, 2 पराभव पाहिले आहेत. दिल्लीच्या संघाने 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील दिल्लीचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या यूपी वॉरियर्सला पराभवाची धुळ चारली आणि 72 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.

दिल्लीचं पारडं जड

दोन्ही संघांमध्ये पॉवर हिटर आणि युवा प्रतिभेचे खेळाडू आहेत. यामुळे त्यांना अंतिम फेरीत बाजी मारण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण ताकदीने उतरतील. मागील सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आता दिल्लीचा आत्मविश्वास सातव्या उंचीवर असेल. मात्र, मुंबईने देखील दिल्लीला जोरदार फाईट दिली होती. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंमध्ये विजयाची आशा आहे.

आणखी वाचा - Urvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO

 

कुठे पहायला मिळेल सामना? (MI vs DC WPL 2023 final match be available)

महिला प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना रविवार, 26 मार्च रोजी IST संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. Sports18 Network वर हा सामना भारतात प्रक्षेपणासाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर JioCinema वर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

Delhi Capitals Women Squad:

मेग लैनिंग (C), शैफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, मरिज़ैन कप्प, एलिस कैपसे, जेस जोनासेन, अरुंधति रेड्डी, तान्या भाटिया (WC), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, जसिया अख्तर, लौरा हैरिस, तारा नॉरिस, मिन्नू मणि, अपर्णा मंडल, तीता साधु, स्नेहा दीप्ति

Mumbai Indians Women Squad:

हेले मैथ्यूज, यास्तिका भाटिया (WC), नेट साइवर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (C), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमायरा काजी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक, हीथर ग्राहम, क्लो ट्राइटन, धारा गुर्जर, सोनम यादव, नीलम बिष्ट, प्रियंका बाला

2023-03-26T09:37:01Z dg43tfdfdgfd