YUVRAJ SINGH ON SURYAKUMAR YADAV :"अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!

Yuvraj singh Rescue Suryakumar Yadav: टीम इंडियाचा सर्वात विस्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जोरदार ट्रोल होत असल्याचं पहायला मिळतंय. मागील 3 वनडे सामन्यात सूर्यकुमार सलग 0,0,0 धावा करत बाद झालाय. त्यामुळे वनडे सामन्यात सूर्या खेळू शकत नाही, असं नेटकरी म्हणत आहे. तर क्रिडाविश्वात देखील अशीच चर्चा होताना दिसते. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj singh) सूर्याच्या बचावासाठी मैदानात उतरला आहे. (Apna surya phir chamkega yuvraj singh came to the rescue of suryakumar yadav who was being trolled after the flop in one day matches)

काय म्हणाला Yuvraj Singh?

आगामी विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सर्वोत्तम खेळाडू आहे. म्हणूनच त्याचं समर्थन केलं पाहिजे, असं युवराज (Yuvraj Singh) म्हणाला आहे. प्रत्येक खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत चढ-उतारांचा सामना करावा लागतो. आपण सगळेच कधी ना कधी अशा प्रसंगातून गेलो आहोत, असं म्हणत त्याने सूर्याची पाठराखण (Yuvraj Singh On Suryakumar Yadav) केली आहे.

आणखी वाचा - Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!

मला खात्री आहे की सूर्यकुमार यादव हा भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि जर त्याला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) संधी मिळाली तर तो महत्त्वपूर्ण योगदान देईल, मी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देईल कारण अपना सूर्या फिर चमकेगा…, असं म्हणत युवराजने सूर्यकुमार यादववर विश्वास (Yuvraj Singh On Suryakumar Yadav) व्यक्त केला आहे.

दरम्यान, युवराजने कॅन्सरशी (Cancer) फाईट करत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केलं आणि टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून दिला. त्यानंतर युवराज संपला असं म्हटलं जात असताना त्याने कॅन्सरला हारवत पुन्हा संघात एन्ट्री केली आणि किंग अल्वेस किंग, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. त्यामुळे वाईट काळात युवराज नेहमी खेळाडूंना मदत करताना दिसतो. वाईट काळात विराटला (Virat kohli) देखील त्याने मदत केली होती. अशातच आता तो सूर्यकुमारच्य़ा पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं दिसतंय.

2023-03-27T17:52:54Z dg43tfdfdgfd