आकाश मधवालचं १०वे षटकं आणि लखनौचा संघ कोलमडला, खुद्द गंभीरने पण घेतला धसका; पाहा VIDEO

चेन्नई: मुंबई इंडियन्सचा युवा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल आपल्या कामगिरीने सतत प्रभावित करत आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलचा त्रिफळा उडवणारा आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करणारा आकाश लखनौ विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करून संघाचा विजयचा हिरो ठरला. आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये, त्याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध एक अप्रतिम ओव्हर टाकली. एकाच षटकात त्याने लखनौच्या दोन धोकादायक फलंदाजांची शिकार केली आणि शेवटी मुंबईने सामना सहज जिंकला.

आधी दबाव मग विकेट

कर्णधार रोहित शर्माने १०वे षटक आकाश मधवालला दिले. पहिला चेंडू आयुष बडोनीच्या पॅडवर वेगाने आदळला. जोरदार अपील होते पण अंपायरने एलबीडब्ल्यू दिला नाही. ईशान किशन आणि आकाश मधवाल यांनी रोहित शर्मावर दबाव टाकून डीआरएस घेण्यास भाग पाडले. इकडे पंचांचा पंचांच्या निर्णयाने बडोनी वाचला. पुढच्या चेंडूवर बडोनीने कव्हर ड्राइव्ह खेळला पण रोहितने अप्रतिम डाईव्ह मारून चेंडू रोखला. तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि बडोनीने फलंदाजीचा प्रयत्न केला पण तो चुकला. तीन डॉट बॉल टाकले.

दोन चेंडूत दोन विकेट

आकाश मधवालने चौथा चेंडू विकेटवर टाकला. त्यावर आयुष बडोनीने बॅट मारली पण चेंडू थेट स्टंप्स जाऊन आदळला. ऑफ-स्टंप हवेत गोलांट्या घेत लांब जाऊन पडला. यानंतर जाणकार निकोलस पूरन क्रीजवर आला. गेल्या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी केली होती. त्याला मधवालने राऊंड द विकेट चेंडू टाकला. यावेळी चेंडू पूरनच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन विकेटकीपरच्या हातात गेला. सलग दोन चेंडूवर २ विकेट त्याने घेतले आणि सुपर जायंट्सना बॅकफूटवर आणले. दोन विकेट्सनंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

५ धावा देत ५ विकेट

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या या सामन्यात आकाश मधवालने ५ धावा देत ५ विकेट घेतले. आयपीएल २०२३ मधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह, आयपीएल एलिमिनेटरमध्ये ५ विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आकाशने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी तो गेल्या वर्षी संघाचा भाग बनला होता.

2023-05-25T03:33:56Z dg43tfdfdgfd