रांची: कसोटी मालिका संपल्यानंतर, आता भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेमध्ये संघ एकमेकांना भिडणार आहे. संघातही विशेष बदल पाहायला मिळत आहे. Shubman Gill Injured, केएल राहुल मालिकेचे नेतृत्व करत आहे आणि मालिका सुरू होण्यापूर्वी, त्याने प्लेइंग इलेव्हनबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आता मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत KL Rahul संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल काय म्हणाला ते पाहा...
रविवार, 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे ODI Series सुरू होत आहे. सामन्याच्या एक दिवस आधी, शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी, केएल राहुल पहिल्यांदाच कर्णधार म्हणून माध्यमांसमोर आला आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान, राहुलने प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या बॅटिंग पोझिशनचीही घोषणा केली. भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले की "मी संपूर्ण मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करेल. मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेन."
याव्यतिरिक्त, ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पंत संघात परतला, तर गायकवाड जवळजवळ दोन वर्षांनी या फॉरमॅटमध्ये परतत आहे. पण त्यापैकी दोघांनाही संधी मिळेल का? पंतबद्दल राहुल म्हणाला की, "तो फलंदाज म्हणूनही खेळू शकतो, परंतु जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो विकेटकीपर म्हणून खेळेल. पंत संघात किती महत्त्वाचा आहे हे सर्वांनी पाहिले आहे. तो फक्त फलंदाज म्हणून खेळण्यास सक्षम आहे, परंतु जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो विकेटकीपिंगही करेल."