चेन्नई : फक्त एका षटकाने यावेळी मुंबई इंडियन्सचा घात केल्याचे पाहायला मिळाले. कारण हे एकच षटक मुंबई इंडियन्ससाठी टर्निंग पॉइंट ठरले. कारण या एका षटकामुळे मुंबईच्या धावांच्या गतीला ब्रेक लागल्यचे पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सने या सामन्यात बहारदार सुरुवात केली होती. पहिल्यात चेंडूवर इशान किशनने चौकार खेचला होता. पण रोहित आणि इशान यांना या संधीचा फायदा उचलता आला नाही. रोहित आणि इशान जरी लवकर बाद झाले असले तरी त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांची भागीदारी मुंबईसाठी महत्वाची ठरली. हे दोघेही अर्धशतकासमीप आले होते. त्यामुळे आता हे दोघे अर्धशतक झळकावतील आणि त्यानंतर ते मोठी खेळी साकारतील असे मुंबईच्या चाहत्यांना वाटत होते. पण नशिबाच्या मनात काही वेगळेच होते. कारण एका षटकामुळे सर्व खेळ बिघडल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट घडली ती ११ व्या षटकात. लखनौकडून ११ वे षटक हे नवीन उल हक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने मोठा फटका मारला. त्यावेळी हा षटकार जाईल, असे वाटत होते. पण यावेळी सूर्याचे टायमिंग चुकले आणि त्याचा हा फटका जास्त हवेत उडाला. त्यामुळे हा षटकार जाणार की नाही, याची शंका चाहत्यांना वाटत होती. चाहत्यांची ही शंका खरी ठरली. कारण सूर्याचे टायमिंग चुकले आणि चेंडू हवेत जास्त उडाला. त्यामुळे सीमारेषेवर गौतमने झेल पडकला आणि सूर्या बाद झाला, सूर्याला यावेळी २० चेंडूंत ३३ धावा करता आल्या. मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. कारण सूर्या हा एकहाती सामना जिंकवणारा खेळाडू होता. सूर्या बाद झाला आणि त्यावेळी मुंबईची सर्व जबाबदारी ही कॅमेरून ग्रीनवर आली होती. कारण तो यावेळी सेट झालेला फलंदाज होता. पण मुंबईला याच षटकात अजून एक धक्का बसला. या षटकाच्या पाचव्या चेंडूंवर नवीन उल हकने ग्रीनला बाद केले आणि मुंबईचे कंबरडे मोडले. ग्रीनला यावेळी २३ चेंडूंत ४१ धावा करता आल्या. त्यामुळे हे एकच षटक मुंबईसाठी टर्निंग पॉइंट ठरले.
मुंबईचे हे दोन्ही फलंदाज मोठी खेळी साकारणारे होते. पण नवीनने त्यांना तर बाद केलेच, त्यापूर्वी त्याने रोहित शर्मालाही तंबूत धाडले होते.
2023-05-24T15:48:44Z dg43tfdfdgfd