करो या मरो सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर, रोहित शर्माने केला एकमेव मोठा बदल

चेन्नई : मुंबई इंडियन्सने लखनौविरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यात टॉस जिंकला. रोहित शर्माने यावेळी टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माने या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला.

रोहितने टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी का घेतली, याचे कारण सांगितले. त्यानंतर रोहितने यावेळी संघ जाहीर केला. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात रोहित शर्माने यावेळी कुमार कार्तिकेयला संघाबाहेर केले आणि त्याच्या जागी यावेळी ह्रतिक शोकिनला संघात स्थान दिले आहे. मुंबईच्या संघाने हैदराबादच्या संघावर विजय मिळवला आणि त्यानंतर आरसीबीचा पराभव झाला. या दोन्ही गोष्टींमुळे आता मुंबईचा संघ एलिमिनेटरमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे आता मुंबईचे मनोबल चांगलेच उंचावलेले असेल. दुसरी गोष्ट म्हणजे हा सामना चेन्नईत खेळवला जात आहे. रोहित शर्माने चेन्नईच्या मैदानात दमदार धावा केल्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित हा आता चांगल्या फॉर्मात आला आहे. रोहितने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते त्यामुळे तो चांगल्या फॉर्मात आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली असून ‘प्लेऑफ’मध्ये नाट्यमय प्रवेशही झाला आहे. यामुळे आत्मविश्वास दुणावला असून याचा फायदा मुंबईला आज, बुधवारी लखनऊ सुपर जायटन्सविरुद्धच्या आयपीएल टी-२० स्पर्धेच्या ‘एलिमिनेटर’मध्ये होईल. त्यामुळे या संघात मुंबईची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईते फलंदाज चांगल्या फॉर्मात आले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर कितीही धावांचे लक्ष्य असले तरी तो पूर्ण करू शकतात. त्यामुळे या सामन्यात जर मुंबईने टॉस जिंकला तर ते प्रथम गोलंदाजी करायला प्राधान्य देतील.

मुंबईची फलंदाजी चांगली होत असली तरी मात्र त्यांची गोलंदाजी चांगली होताना दिसत नाही. मुंबईला आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्य ठेवता आलेले नाही. त्यामुळे जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर ते कशी गोलंदाजी करतात, यावर सारे काही अवलंबून असेल. जर मुंबईची प्रथम फलंदाजी आली आणि त्यांना आपल्या आव्हानाचा बचाव करायचा असेल तर तिथे मुंबईच्या गोलंदाजीचा खरा कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात टॉस महत्वाचा असणार आहे.

मुंबईच्या संघाने जर टॉस जिंकला तर ते प्रथम गोलंदाजी करायला प्राधान्य देतील. त्यामुळे या सामन्यात टॉस कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

2023-05-24T13:49:02Z dg43tfdfdgfd