Nitish Rana : सध्या दिल्ली प्रीमियर लीग खेळवली जात असून यात दररोज एकापेक्षा एक सामने खेळवले जात आहेत. मागील 24 तासांमध्ये नितीश राणाने बॅक टू बॅक मॅच विनिंग इनिंग खेळली आणि वेस्ट दिल्ली लॉयंस संघाला डीपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलं. मात्र या विस्फोटक खेळीनंतर नितीश राणाने सर्व श्रेय हे हनुमान चालीसाला दिलं. नितीश राणाने सांगितलं की तो बॅटिंग करताना खिशात हनुमान चालीसा ठेवतो ज्यामुळे त्याला ऊर्जा मिळते. नितीश राणा हा बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई असून त्याने भाची साची मारवाह सोबत विवाह केला आहे. आता नितीश रविवारी डीपीएलच्या फायनलमध्ये खेळेल. 31 ऑगस्ट रोजी वेस्ट दिल्ली लॉयंसचा सामना आहे सेंट्रल दिल्ली किंग्समध्ये होईल आणि संघाची नजर ही विजेतेपदाची ट्रॉफी जिंकण्याकडे असेल.
नितीश राणाने ईस्ट दिल्ली राइडर्स विरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यात विजय मिळवला. सामन्यात विजय झाल्यावर त्याने म्हटले की, 'मी फलंदाजी करताना हे (हनुमान चालीसा दाखवत) खिशात ठेवतो. शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये राणाने ईस्ट दिल्ली रायडर्सवर 8 विकेट्सनी विजय मिळवला. डीपीएल 2025 च्या अंतिम फेरीत नितीश राणाने आपल्या संघाचे नेतृत्व केले. राणाने स्पर्धेत 10 सामन्यांत 314 धावा केल्या आहेत.
वेस्ट दिल्ली लॉयंससाठी वेस्ट दिल्ली लायन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सुरुवातीचा ओपनिंग फलंदाज अंकित कुमार दोन धावा काढून बाद झाला. कृष यादव (25 चेंडूत 37) आणि दोसेजा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची पार्टनरशिपकरून डाव सावरला. कृष चांगल्या लयीत दिसत होता आणि सहज चौकार मारत होता, पण मयंक रावतने काव्या गुप्ताकरवी त्याला कॅच आऊट करून बाद केले. त्यानंतर दोसेजासोबत नितीश राणाही आला. दोघांनीही नाबाद पार्टनरशिप केली. दोसेजा 49 चेंडूत 54धावा करत नाबाद राहिला तर राणाने 26 चेंडूत 45 नाबाद धावा केल्या, दोघांनी मैदानात टिकून आक्रमक फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा : टी 20 लीगमध्ये तुफान राडा, गोविंदाच्या जावयाने गोलंदाजाचं तोंड बंद करून खेचलं Video
नितीश राणा हा भारतीय क्रिकेटर असून त्याला टी 20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. नितीश राणाने भारताकडून टी 20 मध्ये 2 तर वनडे मध्ये 1 सामना खेळला. नितीश राणाने आयपीएलमध्ये 118 सामने खेळले असून यात 2853 धावा आणि 10 विकेट सुद्धा घेतले आहेत.
नितीश राणाने त्याच्या शानदार फॉर्मचे श्रेय कोणाला दिले?
नितीश राणाने त्याच्या शानदार फॉर्मचे श्रेय हनुमान चालीसाला दिले. त्याने सांगितले की, तो बॅटिंग करताना खिशात हनुमान चालीसा ठेवतो, ज्यामुळे त्याला ऊर्जा मिळते.
नितीश राणाचा हनुमान चालीसाबाबत काय दावा आहे?
नितीश राणाने सांगितले की, तो फलंदाजी करताना खिशात हनुमान चालीसा ठेवतो आणि त्यामुळे त्याला बल्लेबाजी दरम्यान ताकद आणि ऊर्जा मिळते.
क्वालिफायर 2 सामन्यात वेस्ट दिल्ली लॉयंसने कोणत्या संघाला हरवले?
वेस्ट दिल्ली लॉयंसने क्वालिफायर 2 सामन्यात ईस्ट दिल्ली राइडर्सवर 8 विकेट्सनी विजय मिळवला.
2025-08-31T12:24:31Z