गुजरात टायटन्स थेट फायनलमध्ये जाणार; घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जसमोर अडचणींचा डोंगर उभा

चेन्नई: आयपीएल २०२३मधील पहिली क्वॉलिफायर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज (मंगळवारी) होणार आहे. हंगामात गुजरात टायटन्सची कामगिरी केल्या वर्षी प्रमाणेच धमाकेदार झाली आहे. गुणतक्त्यात ते पहिल्या स्थानावर होते. आता क्वॉलिफायल १ मध्ये चेपॉक मैदानावर त्यांची लढत चेन्नईशी होत आहे. या लढतीत जो विजय मिळवेल त्याला थेट फायनलचे तिकिट मिळेल तर पराभव झालेल्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी मिळाले.

गुजरातची लढत चेन्नईविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर होत आहे. तरी देखील या लढतीत चेन्नईचे नव्हे तर गुजरातचे पारडे जड असून याची ३ मुख्य कारणे आहेत.

१) दोन्ही संघातील हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर गुजरात आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत ३ मॅच झाल्या आहेत. यापैकी सर्व लढतीत गुजरातने बाजी मारली आहे. दोन्ही संघात गेल्या हंगामात दोन लढती झाल्या होत्या तर या हंगामात एक लढत झाली आहे. या सर्व लढतीत गुजरातने विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या लढतीत देखील त्यांचे पारडे जड असल्याचे दिसते.

२) गुजरातविरुद्धची क्वॉलिफायल एकची लढत चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजे एम चिंदबरम स्टेडियमवर होत आहे. या वर्षी घरच्या मैदानावर चेन्नईची कामगिरी फार खास झालेली नाही. चेन्नईने चेपॉकवर ७ पैकी ४ लढतीत विजय मिळवला आहे. सीएसकेची ही कामगिरी सरासरी राहिली आहे. धोनी आणि कंपनीला घरच्या मैदानाचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे आजच्या लढतीत घरचे मैदान आहे म्हणून त्यांचा विजय होईल याची हमी नाही. याच बरोबर गुजरात संघाकडे अनेक शानदार खेळाडू आहेत जे चेन्नईवर भारी पडू शकतात.

३) चेन्नईविरुद्धच्या लढतीत गुजरातकडे विजयाचा सर्वोत मोठा एक्स फॅक्टर आहे तो म्हणजे संघात असलेले ३ स्टार खेळाडू होय. पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला मोहम्मद शमीने १४ सामन्यात २४ विकेट घेतल्या आहेत. तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर गुजरातचा राशिद खान आहे ज्याने २४ विकेट घेतल्या आहेत. हे दोन खेळाडू गुजरातला थेट फायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. फलंदाजीत देखील सलामीवीर शुभमन गिलने या हंगामात २ शतक केली आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

2023-05-23T10:03:15Z dg43tfdfdgfd