गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर राहुन मुंबईचा संघ फसला; कारण जो एलिमिनेटर खेळतो तो कधीच...

चेन्नई: आयपीएल २०२३ मध्ये कालपासून प्लेऑफच्या लढती सुरू झाल्या. क्वॉलिफायर १ च्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आत आज बुधवारी एलिमिनेटरच्या लढती लखनौ सुपर जायंटस आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे.

आयपीएलमधील नियमानुसार क्वॉलिफायर १ मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळते. त्याची लढत एलिमिनेटर मधील विजय संघाशी होते. गुणतक्त्यात पहिल्या दोन मध्ये राहण्याचा हा फायदा म्हणावा लागले. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला दोन मॅच खेळून फायनलचे तिकिट मिळते.

प्लेऑफमधून फायनलमध्ये स्थान मिळवणे हे गुणतक्त्यातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांसाठी किती अवघड असते हे यावरून लक्षात येते. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंटसला स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे किती अवघड आहे याची जाणीव नक्कीच असावी. इतक नाही तर आयपीएलच्या इतिहासात एलिमिनेटरचे सामने खेळणाऱ्या संघाचे रेकॉर्ड खराब आहे.

आयपीएलच्या इतिहासात फक्त एकदा असे झाले की, एलिमिनेटरची लढत खेळणाऱ्या संघाने विजेतेपद मिळवले. अशी कामगिरी २०१६च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने केली आहे. तेव्हा डेव्हिड वॉर्नर कर्णधार होता. २०१६ साली हैदराबाद संघ गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यांनी एलिमिनेटरमध्ये केकेआरचा २२ धावांनी पराभव केला. त्यानंतर क्वॉलिफायर २ मध्ये गुजरात लायन्सवर ४ विकेटनी विजय मिळून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अंतिम लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ८ धावांनी पराभव करून विजेतेपद मिळवले. आयपीएलच्या इतिहासातील ही एकमेव घटना आहे जेव्हा एलिमिनेटरमधील संघाने विजेतेपद मिळवले. या घटनेच्या आधी आणि नंतर एकाही संघाला अशी कामगिरी करता आली नाही.

या वर्षी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंटस हे संघ आहेत. मुंबईने पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. यावेळी जर त्यांनी विजेतेपद मिळवले तर मुंबईच्या संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे.

2023-05-24T12:33:43Z dg43tfdfdgfd