फुटबॉल विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्हरपूल एफसीचा आघाडीचा खेळाडू डिओगो जोटा याचा स्पेनमधील एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना झमोरा प्रांतातल्या सानाब्रिया भागात घडली असून, जोटा आपल्या भावासह कारने प्रवास करत होता.
डिओगो जोटाचे नुकतेच, म्हणजे 28 जून रोजी रूटे कार्डोसोसोबत लग्न झाले होते. त्यानंतर तो आपल्या भावासोबत (आंद्रे सिल्वा, पेनाफिएल क्लबचा खेळाडू) कारने प्रवास करत होता. पण झमोरा इथल्या महामार्गावर सर्नादिया नगरपालिकेच्या हद्दीत त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, कारला भीषण आग लागली आणि त्याचा प्रभाव आसपासच्या झाडाझुडपांपर्यंत पोहोचला.
हे ही वाचा: 'त्यांच्या खोलीत मुली पाठवता...', माजी क्रिकेटपटूने उलगडले IPLचे काळे रहस्य, म्हणाले 'पंजाब किंग्सला चॅम्पियन...'
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, कॅस्टिला आणि लियोन भागातील आपत्कालीन सेवा यंत्रणांनी घटनेची पुष्टी केली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. अग्निशमन दल, पोलिस आणि आरोग्य सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
हे ही वाचा: 60 कोटींची मालमत्ता आणि लाखो रुपयांच्या लग्जरी गाड्या... हरभजन सिंगची एकूण संपत्ती माहित आहे का?
पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष पेड्रो प्रोएन्का यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं, “डिओगो आणि आंद्रेच्या जाण्याने फक्त दोन उत्कृष्ट खेळाडू गमावले नाहीत, तर दोन उत्तम माणसेही हरवली आहेत. त्यांच्या स्मृतीला आम्ही कायम जपू.” त्यांनी युरोपियन स्पर्धेतील पोर्तुगाल विरुद्ध स्पेन महिला सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळण्याची मागणी UEFA कडे केली आहे.
डिओगो जोटाने 2020 मध्ये वॉल्व्हरहॅम्प्टनहून लिव्हरपूलमध्ये प्रवेश केला होता. त्याने क्लबसाठी 182 सामन्यांत 65 गोल केले आणि प्रिमियर लीग, एफए कप व लीग कप जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रीय स्तरावर, जोटाने पोर्तुगालसाठी 49 सामने खेळले आणि दोन वेळा UEFA नेशन्स लीग जिंकली.
डिओगो जोटा आणि आंद्रे सिल्वा यांच्या निधनाने फक्त पोर्तुगालच नव्हे तर जागतिक फुटबॉल क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या योगदानाला आठवत, सर्व स्तरांवर त्यांची आठवण जपली जाणार आहे.
2025-07-03T10:24:36Z