फेअरवेल सामन्यात फ्लॉप ठरला उस्मान ख्वाजा... पत्नीच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते

Usman Khawaja Farewell Match : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) त्याच्या निवृत्तीमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला उस्मान ख्वाजाने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर अ‍ॅशेस सीरिजमधील शेवटचा टेस्ट सामना हा त्याचा फेअरवेल सामना ठरला. यावेळी इंग्लंड संघाने त्याचं मैदानावर जोरदार स्वागत केलं. त्याला संघाने 'गॉर्ड ऑफ ऑनर' सुद्धा दिलं. मात्र ख्वाजा खूप वेळ मैदानावर टिकू शकला नाही. त्यानंतर त्याची पत्नी लाईव्ह सामन्यात खूप भावुक झालेली दिसली. 

अ‍ॅशेस सीरिजमधील शेवटच्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा डळमळीत दिसला. 160 धावांचं लक्ष असताना उस्मान ख्वाजाला फलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल हे कठीण वाटतं होते, मात्र संघाने 119 च्या धावसंख्येवर 4 फलंदाजांची विकेट पडली. उस्मान ख्वाजा 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण तो दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. फेअरवेल सामन्यात त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. इंग्लंड संघाने त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.

उस्मान ख्वाजाच्या निवृत्तीत सुद्धा कॉन्ट्रोवर्सी : 

उस्मान ख्वाजाच्या करिअर प्रमाणेच त्याची निवृत्ती सुद्धा कॉन्ट्रोवर्सीने भरलेली आहे. ख्वाजाने ज्यावेळी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याने आपण पाकिस्तान मूळचे असल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये त्याच्या सोबत भेदभाव करण्यात आला असं सांगितलं होतं. त्यानंतरच या मुद्द्यावर जगभरात चर्चा झाली.  उस्मान ख्वाजा शेवटच्या सामन्यात फ्लॉप ठरल्यावर त्याची पत्नी खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. यावेळी ख्वाजाने तिला फ्लायिंग किस सुद्धा दिली.  

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना : 

ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजयासाठी दिलेलं 160 धावांचं लक्ष पार केलं. संघाने 5 विकेटने हा सामना जिंकला असून यासह सीरिज सुद्धा 4-1 ने जिंकली आहे. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा ख्वाजाची फलंदाजी चालली नाही. तो केवळ 17 धावा करून बाद झाला. इंग्लंडकडून जेकब बेथेलने शानदार शतक झळकावले, तर ऑस्ट्रेलियाकडून हॅरी ब्रुक, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांनी उत्कृष्ट खेळी केली.

हेही वाचा : 6 वर्ष डेट करून बहिणीशी केलं लग्न, स्टार क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी माहितीये का?

कोण आहे उस्मान ख्वाजा?

उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघासाठी खेळणारा पहिला मुस्लिम क्रिकेटर होता. उस्मान ख्वाजाचा जन्म हा पाकिस्तानात झाला होता. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ख्वाजा हा अनेक वादांमध्ये अडकला. उस्मान ख्वाजाचं करिअर हे फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित नाही. तो ऑस्ट्रेलियाचा पहिला मुस्लिम आणि मूळ पाकिस्तानचा असल्याने त्याने अनेकदा वारंवार वांशिक आणि सांस्कृतिक पूर्वग्रहाचा मुद्दा उपस्थित केला.  ख्वाजावर वारंवार फिटनेस आणि फिल्डिंगबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याने या आरोपांना रूढीवादी विचारसरणीशी जोडलं आणि त्याच्या सारख्याच फिटनेस असणाऱ्या इतर खेळाडूंना एवढी कठोर टीका सहन करावी लागत नाही असं सांगितलं. या विधानामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत विचारसरणीबाबत वाद निर्माण झाला.  

2026-01-08T07:54:29Z