कार्डिफ : काही दिवसांतच टी -२० वर्ल्ड कपची सुरवात होणार आहे. यासाठी सगळ्याच संघानी चांगलीच कंबर कसायला सुरवात केली आहे. असे असताना पाकिस्तानच्या कर्णधारचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून याची चर्चा सर्वत्र चालू आहे. तर हा व्हिडिओ पाहून अनेक चाहते संतापले. बाबारचा स्टारडम त्याच्या डोक्यावर चढले असल्याचेही बोलले जात आहे.
चार सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला. टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघाची ही शेवटची मालिका आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशी परिस्थिती असताना बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ करो या मरो स्थितीत इंग्लंडविरूद्ध तिसरा सामना खेळणार आहे. तर ही मालिका जिंकून टी-२० विश्वचषकासाठी मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेल.
टी-२० वर्ल्ड कपसाठी रविवारपासून सराव सामन्याची सुरूवात झाली आहे. संघ टी-२० साठी रवाना झाले आहेत. तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम कार्डिफला पोहोचला. बाबर येथील एका चौकात कोणाची तरी वाट पाहत असतानाच चाहत्यांनी त्याला ओळखले. आणि त्याच्या भोवती चाहत्यांनी गर्दी केली. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार चिडला आणि त्याने चाहत्यांशी गैरवर्तन केले. यावेळी त्याच्या अंगरक्षकाने चाहत्यांना धक्का देत मागे ढकलले.
पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराचा बाबर आझमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर तो या व्हिडिओमध्ये गर्दी केलेल्या चाहत्यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. बाबरच्या या वागणुकीमुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याच्या डोक्यावर स्टारडम चढल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
बाबरचा व्हिडिओ हा काही वेळ सोशल मीडियावर दिसत होता. पण त्यानंतर त्याचे हे व्हिडिओ डिलीट करण्यात आले. त्यामुळे बाबरचे याबाबतचे कोणतेही व्हिडिओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर दिसत नसल्याचे समोर आले आहे. पण बाबर चाहत्यांशी असा वागू शकतो, यावर त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-05-28T18:42:16Z dg43tfdfdgfd