रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना हा महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानात म्हणजेच रांचीमध्ये होत आहे. भारताचा पहिला सामना हा फक्त काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. हा सामना आता नेमका कुठे लाइव्ह पाहायला मिळणार, याची माहिती समोर आली आहे.
भारताचा सामना किती वाजता सुरु होणार.. (IND vs SA 1st ODI Timming)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना सुरु करण्यात कोणती अडचण तरी नाही, हे पाहण्यासाठी पंच दुपारी १२.०० वाजता मैदानात उतरतील. जर सामना सुरु करण्यासाठी कोणतीही समस्या नसेल तर पंच दोन्ही कर्णधारांना टॉससाठी सज्ज राहण्यासाठी सांगतील. टॉस झाल्यावर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू काही काळ मैदानात सराव करतील. टॉस झाल्यावर अर्ध्या तासाने म्हणजेच दुपारी १.३० वाजता हा सामना सुरु करण्यात येणार आहे.
भारताचा हा सामना कुठे लाइव्ह पाहायला मिळू शकतो.. (IND vs SA 1st ODI Live Streaming)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचा एकही क्षण चाहते चुकवणार नाहीत. हा सामना लाइव्ह पाहायचा असेल तर तो दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पाहायला मिळू शकतो. हा पहिला सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर मोबाईलवर हा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Jio Hotstar वर जावे लागेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यावेळी तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतीच सुरुवात रविवारी ३० नोव्हेंबरला होणार आहे.
2025-11-29T17:38:19Z