अहमादाबाद : मिचेल स्टार्कच्या वेगवान चेंडू पाहण्याचा योग पुन्हा एकदा आला. मिचेलने यावेळी क्वालिफायर १ सामन्यात असा काही चेंडू टाकला की फलंदाजाल क्लीन बोल्ड झाल्याचे समजलेच नाही. या विकेटचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट घडली ती पहिल्याच षटकात. मिचेल हा गोलंदाजीसाठी सज्ज होता. मिचेलचा सामना यावेळी करत होता तो हैदराबादचा सलामीवीर ट्रेव्हिस हेड. या सामन्यातील पहिला चेंडू मिचेलने चांगलाच टाकला. पण ही गोष्ट घडली ती दुसऱ्या चेंडूवर. मिचेल हा चेंडू स्विंग करण्यात मातब्बर आहे आणि त्याचबरोबर त्याचा वेगही कमी होत नाही. हीच गोष्ट यावेळी दुसऱ्या चेंडूवरही पाहायला मिळाली.
मिचेलने यावेळी मिडल स्टम्पवर चेंडू टाकला होता. त्यानुसार खेळण्यासाठी हेडने आपली बॅट मिडल स्टम्पच्या लाईनमध्य आणली होती. त्यामुळे आपण या चेंडूचा समर्थपणे सामना करू, असे हेडला वाटले असावे. पण यावेळी जेव्हा चेंडू पडला, त्यानंतर तो थोडा उशिरा स्विंग झाला. त्यामुळे हा चेंडू मिडल स्टम्पवर पडला असला तरी त्यानंतर तो चांगलाच वळला आणि हेडच्या ऑफ स्टम्पच्या दिशेने निघाला. त्याचबरोबर या चेंडूला चंगला वेगही होता. त्यामुळे हेडला आपल्या बॅटची जागा बदलायला हवी,हे समजलेच नाही. जेव्हा चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला तेव्हा हेडला समजले की, हा चेंडू आपल्याला खेळता आलेला नाही. या चेंडूमध्ये स्विंग तर होताच, पण मिचेलच्या वेगाने अजून जास्त कमाल केली. त्यामुळे पहिल्याच षटकात केकेआरला हैदराबादला मोठा धक्का देता आला. मिचेलच्या या विकेटमुळे हैदराबादची १ बाद ० धाव, अशी अवस्था झाली होती.
मिचेलने यावेळी संघाला दमदार सुरुवात करून दिली. मिचेलने पहिल्याच षटकात ट्रेव्हिस हेडला बाद केले. पण स्टार्क फक्त यावर थांबला नाही. कारण त्यानंतर स्टार्कने नितीष कुमार रेड्डी आणि शाहबाझ अहमद यांना एकाच षटकात बाद केले. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्येच केकेआरने हैदराबादला बॅकफूटवर ढकलल्याचे पाहायला मिळाले.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-05-21T15:15:39Z dg43tfdfdgfd