रवी शास्त्री अजूनही प्रशिक्षकाच्याच भूमिकेत, जडेजा व अश्विन यांच्याबाबत केलं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : 'भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या जमेच्या बाजूंचा विचार करून मैदानात उतरायला हवे. यासाठी आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकी गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये संधी द्यावी,' अशी सूचना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत सात जूनपासून लंडनमध्ये 'द ओव्हल'वर खेळली जाणार आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ओव्हलवर २०२१मध्ये कसोटी लढत जिंकली होती. म्हणूनच शास्त्री यांनी या कसोटीसाठी भारताच्या सर्वोत्तम अकरा खेळाडूंची निवड केली आहे.

'आयसीसी रिव्ह्यू'मध्ये बोलताना शास्त्री म्हणाले, 'मागील दौऱ्यात इंग्लंडमध्ये भारताची कामगिरी चांगली झाली होती. कारण त्या वेळी भारतीय संघात जसप्रीत बुमराह, महंमद शमी, शार्दूल ठाकूर, महंमद सिराज होते. म्हणजे तुमच्याकडे चार वेगवान गोलंदाज होते आणि त्यात शार्दूलसारखा एक अष्टपैलू होता. इंग्लंडमध्ये खेळताना तुम्हाला असाच संघ निवडावा लागतो. खासकरून भारताच्या दृष्टीने. त्यामुळे रोहित शर्मासारख्या फलंदाजाला खेळावर चांगले नियंत्रण ठेवता येते.'

फॉर्मवरून संघ निवड खेळाडूंची निवड ही परिस्थिती आणि सध्याच्या फॉर्मवरून करावी, असे शास्त्री यांना वाटते. ते म्हणाले, 'सर्व गोष्टींचा विचार करूनच संघ निवडला जावा. भेदक मारा करू शकत नाही. वयामुळे त्यांना तेवढी आक्रमक गोलंदाजी करता येत नाही, तर तुम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरायला हरकत नाही. अशा स्थितीत अश्विन आणि जडेजा या दोन प्रमुख फिरकी गोलंदाजांना तुम्हाला अंतिम अकरामध्ये संधी देता येईल.'

अंतिम लढतीसाठी भारतीय संघात अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल अशा तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. सहा प्रमुख फलंदाज आयपीएलमधून काही खेळाडू अंतिम लढतीत खेळणार आहे. तेव्हा इंग्लंडच्या वातावरणात वेगवान गोलंदाजांसाठी तंदुरुस्ती चिंतेचा विषय ठरू शकते, असे शास्त्रींना वाटते. ते म्हणाले, 'खेळपट्टी टणक आणि कोरडी असेल, तर तुम्ही दोन फिरकी गोलंदाजांना संधी द्यायला हरकत नाही. इंग्लंडमधील वातावरणावर बरेच काही अवलंबून असेल. सध्या तरी तेथे चांगले उन आहे. अर्थात, जूनमध्ये इंग्लंडमधील वातावरण कधीही बदलू शकते. तेव्हा भारतीय संघाने दोन फिरकी, दोन वेगवान आणि एक अष्टपैलू खेळाडूसह मैदानात उतरायला हवे. त्यानंतर पाच तज्ज्ञ फलंदाज आणि एक यष्टिरक्षक- फलंदाज, असा संघ तुम्हाला निवडावा लागेल.'

2023-05-25T14:19:06Z dg43tfdfdgfd