रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर रवी शास्त्री यांचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाले 'मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये...'

Ravi Shastri On Rohit Sharma: मुंबई इंडियन्स संघाची ही नेहमीची सवय आहे, सुरूवातीला हळू खेळायचं आणि अनपेक्षितरित्या धक्कातंत्र वापरून प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा. यंदाच्या आयपीएलमध्ये हीच परंपरा मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कायम ठेवली आहे. पहिल्या सात सामन्यानंतर मुंबईचा संघ अंकतालिकेमध्ये 9 व्या स्थानी होता. मात्र, अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) जादूची कांडी फिरवली आणि पुन्हा एकदा पलटणने प्लेऑफ गाठलं.

प्लेऑफच्या एलिमिनेटर (LSG vs MI Eleminator) सामन्यात पलटणने लखनऊचा टांगा पलटी करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये थाटात एन्ट्री मिळवली आहे. लखनऊला 81 धावांनी पराभूत करत आता मुंबईचा संघ फायनलच्या (IPL 2023 Final) दिशेने मार्गस्त झालाय. अशातच आता मुंबईच्या कामगिरीवर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri On Mumbai Indians) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले रवी शास्त्री?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मात्र, यंदाच्या प्लेऑफमध्ये रोहित शर्माची देहबोली आणि ऊर्जा खूप वेगळी आहे. प्लेऑफच्या आधी काय झालं ते विसरून जातात. रोहित शर्माने धावा केल्या की नाही याची पर्वा न करता, ते संघ म्हणून समोरच्या संघावर हल्लाबोल करतात. पण एकदा का संघ प्लेऑफमध्ये पोहोचला की पुन्हा विजेतेपद मिळवू शकतो, असंही रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

Rohit Sharma: 'नो मॅटर, तु कोण आहेस', रवी शास्त्री यांची कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या फॉर्मवरून खडे बोल सुनावले होते. तुम्ही धावा काढत नसाल तर मैदानावरील ऊर्जा कमी होते. मग तुम्ही कोण आहात, याने काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं होतं.

मुंबई इंडियन्सचा आगामी सामना 26 मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. रोहित शर्माचं फॉर्म सध्या संघासाठी डोकेदुखी ठरतोय. रोहितने एकूण 14 सामन्यात 125 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता कॅप्टनच फॉर्ममध्ये नसल्याने टीम कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहितसमोर रशीद खान आणि नूर अहमद यांच्या फिरकीचं आव्हान असेल.

2023-05-25T12:33:21Z dg43tfdfdgfd