रोहित शर्मा भारताची खरी ताकद, जॉन्टी ऱ्होड्स उघडपणे बोलला; सिलेक्शन कमिटीलाही मोठी हिंट, काय म्हणाला?

jonty Rhodes News : भारताचा स्टार रोहित शर्मा वर्ल्डकप २०२७ खेळणार की नाही हे अजूनही काही फिक्स नाही. मात्र जॉन्टी ऱ्होड्सने रोहित हा भारताची ताकद असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच विराट कोहलीही महत्त्वाचा खेळाडू असून त्याला जिंकण्याची भूक असल्याचं म्हटलं आहे. सिलेक्शन कमिटीला त्याने हिंटच दिलीय, नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

हिटमॅन भारताची ताकद

आगामी वर्ल्डकप २०२६ साठी भारतीय संघ व्यवस्थापन आता तयारीला लागलं आहे. बीसीसीआयची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. यामध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे रोहित शर्मा याची वनडे वर्ल्डकपसाठी निवड करायची की नाही? पण दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्स याने हिटमॅन भारताची ताकद असून त्याला संघात का ठेवावं हे सांगितलं आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ फायनलमधील पराभवाची सल रोहितच्याही मनात

वनडे वर्ल्डकप २०२७ खेळण्याची रोहित शर्मा याची मनापासून इच्छा आहे. त्याने अनेकदा बोलूनही दाखवलं आहे, वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये त्याने आपल्या नेतृत्त्वात संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते पण तो अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. याची सल सर्व भारतीयांच्या मनात राहिली आहे. आपल्या देशात येत शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय संघाला कांगारूंनी फायनल सामन्यात पराभूत करत विजेतेपदापासून दूर ठेवले होते. जर तो वर्ल्डकप भारत जिंकला असला तर कदाचित रोहितने निवृत्ती घेतली असती. पण वनडे वर्ल्डकप २०२७ रोहितचा शेवटचा वर्ल्डकप असेल यात काही शंका नाही. कारण रोहितचे वाढते वय हा एक मुद्दा आहे. जॉन्टी ऱ्होड्सने रोहितचा संघात समावेश असल्याने काय फायदा होईल हे सविस्तरपणे सांगितलं.

वर्ल्डकप स्पर्धा खूप दबावाची

वर्ल्डकपसाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अनुभव. ज्याचा सगळेजण विचार करत नाही. खेळाडूच्या प्रतिभा, क्षमता आणि कामगिरीचा विचार करतो. एखादा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असेल किंवा संपूर्ण सीझन त्याने दमदार कामगिरी केली असेल. पण प्रेशर म्हणजेच दबावाचा मुद्दा येतो त्यावेळी काय आणि वर्ल्डकप स्पर्धा खूप दबावाची असते, असं जॉन्टी ऱ्होड्सने सांगितलं.

ताज्या घडामोडींची माहिती मिळवा, तीही कधीही आणि कुठेही. महाराष्ट्र टाइम्स ॲप आत्ताच डाउनलोड करा!

रोहित शर्मासारखा खेळाडू तुमच्या संघात असणं मोठी गोष्ट- जॉन्टी ऱ्होड्स

खेळाडू शारीरिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेऊ शकतात, पण मानसिक ताकद ही अशी गोष्ट आहे, जी निवड करताना आपण अनेकदा विचारात घेत नाही. मात्र, चार क्रिकेट वर्ल्डकप खेळलेल्या आणि दोन वेळा उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ न शकलेला व्यक्ती म्हणून मला माहीत आहे की हा अनुभव किती तणावपूर्ण असू शकतो. त्यामुळे रोहित शर्मासारखा खेळाडू तुमच्या संघात असणे वर्ल्ड कपमध्ये खूप मोठी गोष्ट असल्याचं जॉन्टी ऱ्होड्स म्हणाला.

जिंकण्याची भूक ही विराट कोहलीमध्ये- जॉन्टी ऱ्होड्स

ऑस्ट्रेलियाला आपण अनेकदा वर्ल्डकप जिंकताना पाहिलं आहे. त्यांचे अॅग्रेशन आणि जिंकण्याची भूक ही विराट कोहलीमध्ये दिसते. आपल्या संघासाठी सामना जिंकण्याची मानसिकता त्याच्यामध्ये दिसते. विराट बॅटिंग करत असताना समोर कोण आहे याचा त्याला काही फरक पडत नाही. त्याला लढायला आवडतं आणि त्याला एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे भारताने जिंकावं, असं जॉन्टी ऱ्होड्स म्हणाला.

वर्ल्डकप स्पर्धा खेळण्याचा दांडगा अनुभव

भारताला सामना जिंकवण्यासाठी त्याच्यात प्रचंड जिद्द दिसून येते. तो कर्णधार असो किंवा नसो त्याला फरक पडत नाही, असंही जॉन्टी ऱ्होड्सने म्हटलं आहे. एकंदरित जॉन्टी ऱ्होड्सच्या मते वर्ल्डकप २०२७ साठी भारतीय संघात हे दोन खेळाडू असायला हवं असं त्याचं म्हणणं आहे. कारण तसं पाहायला गेलं तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वर्ल्डकप स्पर्धा खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. विराटने चार तर रोहितने तीन वर्ल्डकप खेळले आहेत.

मोहम्मद शमी यालाही संघात घेण्याची मागणी

दरम्यान, शुभमन गिल याच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वर्ल्डकप २०२७ साठी उतरेल. मोहम्मद शमी यालाही संघात घेण्याची मागणी चाहते करत आहे. पण वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रित बुमराहसोबत नवीन गोलंदाजही पाहायला मिळू शकतो. बीसीसीआयच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये या सर्वांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

तुमचे नाव तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे का? – आजच तुमच्यासाठी आदर्श नाव शोधा

महाराष्ट्र टाइम्स सोबत ताज्या बातम्यांशी अपडेट राहा. सिटी न्यूज, इंडिया न्यूज, बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज मधील सर्व ट्रेंडिंग आणि ब्रेकिंग बातम्या मिळवा. एंटरटेनमेंट न्यूज, टीव्ही न्यूज आणि लाइफस्टाइल टिप्स साठीही महाराष्ट्र टाइम्स ला भेट द्या.

2026-09-03T07:23:21Z