चेन्नई : मुंबईच्या संघाने लखनौवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी आता क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला आहे. पण या विजयानंतर मुंबईच्या संघाची चांगलीच पळापळ झाली. या धावपळीमुळे मुंबईच्या एकाही खेळाडूला रात्रभर पूर्ण झोपताच आले नाही.
मुंबईच्या संघाने एलिमिनेटर सामन्यात लखनौवर तब्बल ८१ धावांनी विजय साकारला. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो आकाश मढवाल. कारण आकाशने पाच विकेट्स फक्त पाच धावांत मिळवले आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईने हा धडाकेबाज विजय साकारला आणि त्यांचा आता सामना गुजरात टायटन्सबरोबर होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामना रात्री उशिरा संपला. त्यानंतर मुंबईचा संघ हा जवळपास १२ ते १ वाजेपर्यंत मैदानातच होता. त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी संघाची बस पकडली आणि ते आपल्या हॉटेलमध्ये रवाना झाले. पण हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांना झोपायला वेळ मिळाला नाही. कारण त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंना आवरा आवर करावी लागली. कारण मुंबईच्या संघाला ३ वाजेपर्यंत चेन्नईच्या विमानतळावर पोहोचायचे होते. कारण त्यांचे पहाटे ५.३० वाजता गुजरातला जाण्यासाठी विमान होते. त्यामुळे त्यांना विमानतळावर चेक इन करायला ३.०० वाजताचा वेळ दिला होता. त्यामुळे मुंबईचे खेळाडू हे ३ वाजता विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांची सर्व प्रकीया विमानतळावर पूर्ण होण्यासाठी जवळपास १ तास लागला. त्यानंतर त्यांनी विमानात प्रवेश केला आणि त्यानंतर ते गुजरातला पोहोचले. पण त्यासाठी मुंबईच्या खेळाडूंना मात्र रात्रभर झोप मिळाली नाही. कारण विजयानंतर ते थेट हॉटेलमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी गुजरातला जाण्याची आपली तयारी सुरु केली. त्यामुळे गुरुवारी काही वेळ मुंबईचे खेळाडू झोप घेऊन ताजेतवाने होतील आणि त्यानंतर गुजरातच्या सामन्याचा विचार करतील.
मुंबई आणि गुजरात यांच्यातील क्वालिफायर २ हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
2023-05-25T12:49:06Z dg43tfdfdgfd