बेंगळुरू : विराट कोहली आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे. कारण आता त्याने बीसीसीआय खास विनंती केल्याचे समोर आले आहे.
आयपीएलमध्ये कोहलीने बऱ्याच जणांशी पंगा घेतला. कोहलीने प्रथम बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी मैदानातच पंगा घेतला होता. त्यानंतर गांगुलीने त्याच्याशी हात मिळवण्यास नकार दिला होता. त्यानंतर कोहली हा लखनौच्या नवीन उल हक या खेळाडूला भिडला होता. या दोघांचा वाद संपत नाही तोच कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मैदानातच राडा झाला होता. त्यानंतर आता कोहली शांत झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यावर आता कोहलीने बीसीसीायला खास विनंती केली आहे.
आयपीएलनंतर भारताचे खेळाडू विश्व अजिंक्यरपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी इंग्लंडला जाणार आहे. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह भारताचे काही खेळाडू मंगळवारी इंग्लंडला जाण्यासाठी प्रयाण करणार होते. पण त्याबाबत आता कोहलीने बीसीसीआयने एक विनंती केली आहे. आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेल्या संघातील खेळाडू मंगळवारी रवाना होणार होते. मात्र, विराट कोहलीने आपले प्रयाण लांबवण्याची विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळास केली होती. त्य़ांची विनंती मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्येच आहे. याच वेळी रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, ईशान किशन, शुभमन गिल, महंमद शमी, श्रीकर भरत आणि अजिंक्य रहाणे दोन टप्प्यात रवाना होतील. पुजारा वगळता भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएल खेळत होते. भारतीय संघ या कसोटीपूर्वी इंग्लंडमध्ये एकही सराव सामना खेळणार नाही. ही लढत लंडन येथील ओव्हल मैदानात ७ जूनपासून होणार आहे.
आयपीएल खेळत असताना कोहली नेमकं काय म्हणाला होता, जाणून घ्या...'आयपीएलमधील कामगिरीने मला खूप छान वाटते आहे. अनेकांना असे वाटले होते, की माझ्या टी-२० कारकीर्द मावळतीला लागली आहे. मला मात्र तसे अजिबात वाटत नाही. मला तर वाटते, की मी आता माझे सर्वोत्तम टी-२० खेळतो आहे,' असे विराट कोहलीने बीसीसीआयच्या वेबसाइटवरील मुलाखतीत म्हटले आहे.
2023-05-25T15:49:04Z dg43tfdfdgfd