शेवटी युवराजचाच पठ्ठ्या, BCCIने टीम इंडियामधून काढल्यावर 8 तासातच ठोकलं तुफानी शतक; पाहा कोण?
![]()
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियममध्यी तीन सामन्यांची मालिका पार पडणार आहे. १३ सप्टेंबरला पहिला सामना होणार असून बीसीसीआयने मंगळवारी या मालिकेसाठी संघाची घोषणा केलीय. याआधी झिम्बाव्बेविरूद्धच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघामधील ८ खेळाडूंना संघातून वगळ्यात आले आहे. यामध्ये आक्रमक खेळाडू प्रभसिमरन सिंग याचाही समावेश आहे. बीसीसीआयने त्याला वगळले पण त्यानंतर पठ्ठ्याने शतकी खेळी करत आपली क्षमता निवड समितीला दाखवून दिली आहे. भारताचा चॅम्पियन खेळाडू युवराज सिंगच्या तालमीत प्रभसिमरन सिंग घडला आहे.
ताज्या घडामोडींची माहिती मिळवा, तीही कधीही आणि कुठेही. महाराष्ट्र टाइम्स ॲप आत्ताच डाउनलोड करा!
एकाच मॅचध्ये दोन तुफानी शतके
शेर ए पंजाब टी-२० लीगमधील पाचवा सामना जालंधर वॉरियर्स वि. अमृतसर सूरमास यांच्यात पार पडला. या सामन्यात धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. कारण अमृतसर सुरमास यांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभा केला होता.
अभिषेक शर्मा याने अमृतसर संघाचे नेतृत्त्व करताना २६ चेंडूत ८६ धावांची तुफानी खेळी केली होती, यामध्ये त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. तर त्याला नमन धीरने साथ देताना ५६ चेंडूत ११७ धावांची शतकी खेळी करताना ७ चौकार आणि १० षटकार मारले. दोघांच्या धडाकेबाजा खेळीने त्यांच्या संघाने २५० धावांचा टप्पाही पार करत २६५ धावांचे टार्गेट जालंधर वॉरियर्ससमोर ठेवले होते.
जालंधर वॉरियर्स वि. अमृतसर सुरमास सामना
जालंधर वॉरियर्स संघाचा सलामीवीर खेळाडू प्रभसिमरन सिंग याने मोठ्या लक्ष्याचा कसलाचा दबाव न घेता तोडफोड फलंदाजी करताना ४७ चेंडूत नाबाद १२५ धावा कुटल्या. आपल्या खेळीमध्ये त्याने १४ चौकार आणि ८ षटकार मारले होते. शेवटला अनमोल मल्होत्रा या दोघांनी डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रभसिमरन याच्या नाबाद शतकी खेळीने जालंधर संघाने १६.५ ओव्हरमध्येच ८ विकेट राखून हे लक्ष्य पूर्ण करत सामना खिशात घातला.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी प्रभसिमरन सिंग याची निवड झाली होती. पण तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये त्याला संधी मिळाली नाही. कारण संघात इशान किशन असल्याने त्याची वरिष्ठ संघात निवड होऊनही प्लेइंग ११ मध्ये त्याला घेतले गेले नाही. आता अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यावर बीसीसीआयने झिम्बाव्बे दौऱ्यातील ८ खेळाडूंना बाहेर बसवले आहे. यामध्ये रिंकू सिंग, सूर्याश शेडगे, हर्ष दुबे, यश ठाकूर, मयांक यादव, अशोक शर्मा आणि प्रभसिमरन सिंगचा समावेश आहे.
अफगाणिस्तानविरूद्ध भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन (दोघेही यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितिश कुमार रेड्डी*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर*, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह*, अर्शदीप, हर्षित राणा*, ( * केलेला खेळाडू तंदुरुस्त असल्यास अंतिम संघात)
तुमचे नाव तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे का? – आजच तुमच्यासाठी आदर्श नाव शोधा
महाराष्ट्र टाइम्स सोबत ताज्या बातम्यांशी अपडेट राहा. सिटी न्यूज, इंडिया न्यूज, बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज मधील सर्व ट्रेंडिंग आणि ब्रेकिंग बातम्या मिळवा. एंटरटेनमेंट न्यूज, टीव्ही न्यूज आणि लाइफस्टाइल टिप्स साठीही महाराष्ट्र टाइम्स ला भेट द्या.
2026-09-02T09:53:21Z