मुंबई, 16 जानेवारी : टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर पंतवर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, यानंतर त्याला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पुढच्या उपाचारांसाठी आणण्यात आलं. काहीच दिवसांपूर्वी ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अपघातानंतर ऋषभ पंतने ट्वीट करून त्याच्या हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार ऋषभ पंतने मानले आहेत. मदत करणाऱ्यांचे फोटोही ऋषभ पंतने शेअर केले आहेत. 'मी वैयक्तिकरित्या सगळ्यांचे आभार मानू शकत नाही, पण मी हे दोन हिरो रजत कुमार आणि निशू कुमार यांचे आभार मानतो. यांनी अपघातावेळी माझी मदत केली आणि मला सुरक्षित हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. धन्यवाद, मी कायमच तुमाचा आभारी आणि ऋणी राहीन,' असं ऋषभ पंत त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.
ऋषभ पंतने याआधी दोन आणखी ट्वीट केले, यात त्याने स्वत:च्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. 'मला दिलेला पाठिंबा आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. रिकव्हरीला सुरूवात झाली आहे. पुढच्या आव्हानासाठी तयार आहे. बीसीसीआय, जय शाह आणि सरकारी संस्थांना धन्यवाद,' असं पंत त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
'माझे चाहते, टीममधले सहकारी, डॉक्टर आणि फिजिओ यांचेही त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबाबत धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना मैदानात बघण्यासाठी उत्सुक आहे,' असं दुसरं ट्वीट ऋषभ पंतने केलं.
ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला तेव्हा रजत कुमार आणि नीशू कुमार घटनास्थळी आले होते. या दोघांनीच ऋषभ पंतचं सगळं सामान आणि पैसे जळलेल्या कारमधून बाहेर काढले. रजत आणि निशूने पोलिसांना पंतचं सगळं सामान दिलं. हे दोघं पंतला भेटायला मॅक्स हॉस्पिटलमध्येही आले होते. रजत कुमार आणि निशू कुमार मुजफ्फरनगरचे रहिवासी आहेत.
2023-01-16T17:33:40Z dg43tfdfdgfd