न्यूझीलंड विरुद्ध वनडेतील पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेयिंग 11

मुंबई, 18 जानेवारी : आजपासून न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.  हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह आहे. श्रीलंके विरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते. दिग्गज खेळाडूंसह युवा खेळाडूंनी देखील कमाल खेळी दाखवल्यामुळे भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्यात यशस्वी ठरला. तेव्हा आजच्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये कोणाला संधी दिली जाईल हे पाहणं  उत्सुकतेचं आहे.

न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा तारणहार ठरलेला के एल राहुल आणि अक्सर पटेल हे  दोघे कौटुंबिक कारणामुळे न्यूझीलंड मालिकेत खेळणार नाहीत. के एल राहुलला या सामन्यात ईशान किशन रिप्लेस करणार आहे. तसेच युवा फलंदाज श्रेयस अय्यर याला देखील पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली असल्याने त्याऐवजी आयपीएलचा स्टार खेळाडू रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे.  तसेच श्रीलंके विरुद्ध तिसऱ्या सामन्यात प्लेयिंग 11 बाहेर राहिलेल्या हार्दिक पांड्याला आजच्या सामन्यात पुन्हा 11 खेळाडूंमध्ये संधी दिली जाऊ शकते. तसेच स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा देखील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे मालिकेत प्लेयिंग 11 मध्ये पहायला मिळण्याची शक्यता आहे.

हे ही पहा  : IND VS NZ : श्रीलंके प्रमाणे टीम इंडिया न्यूझीलंडवरही पडणार भारी? कधी, कुठे पहाल सामना?

अशी असेल भारताची प्लेयिंग ११ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

2023-01-18T06:34:15Z dg43tfdfdgfd