मुंबई 21 डिसेंबर : भारतीय क्रिकेटर केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत सात फेरे घेणार असल्याचं कन्फर्म झालंय. या बातमीमुळे त्या दोघांच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवाय त्यांचे कुटुंबीय देखील या बातमीने आनंदी आहेत. इतक्या दिवसापासून क्रिकेटर केएल राहूल आणि अथिया शेट्टी यांच्या डेटींगच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर हे दोघे लग्न करणार अशा देखील अनेक बातम्या समोर आल्या होत्या, पण त्या सर्व अफवा ठरला.
अखेर जोडप्याने त्याचं रिलेशनशिप स्वत: मान्य केलं आणि लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं आणि आता तो दिवस जवळ आलाच.
हे ही पाहा : ''सारा आणि शुभमन गिलचा ठरला साखरपुडा'', क्रिकेटरचा खेळ पाहून सचिनकडून घोषणा?
या दोघांचाही लग्न सोहळा सलग तीन दिवस चालणार आहे. या सोहळ्यात कॉकटेल पार्टी, मेहंदी, हळदीसह अनेक कार्यक्रम केले जाणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना या लग्नाबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल जाणून घेण्याची अधीक इच्छा आहे. चला मग एक नजर टाकूयात की कोणत्या दिवळी काय कार्यक्रम असणार आहे.
23 जानेवारीला हे दोघेही सात फेरे घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. हे लग्न अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येच होणार आहे. अथिया शेट्टीचे वडील बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी आहेत. लग्नाची सर्व तयारी शेट्टी आणि केएल राहुलच्या कुटुंबाने केली आहे.
हा विवाह सोहळा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात हे लग्न होणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शनिवारपासून लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. शनिवारी संध्याकाळी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीने प्री-वेडिंग कार्यक्रम सुरू होतील.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (२२ जानेवारी) मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या दरम्यान कुटुंबातील फक्त जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुसरा दिवस म्हणजेच सोमवार (२३ जानेवारी) केएल राहुल आणि अथिया शेट्टीसाठी खूप खास असणार आहे. या दिवशी दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच सहभागी होणार आहेत.
लग्नानंतर मुंबई-बेंगळुरूमध्ये दोन मोठे रिसेप्शन होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नानंतर सुनील शेट्टी आणि केएल राहुलचे कुटुंब उर्वरित मित्र आणि नातेवाईकांसाठी लग्नाचे दोन मोठे रिसेप्शन ठेवले असल्याचे समोर आले आहे. हे रिसेप्शन मुंबई आणि बंगळुरूमध्ये होणार आहेत. यामध्ये क्रिकेट टीमचे स्टार खेळाडू, बॉलीवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी यांना बोलावण्यात येणार आहे.
2023-01-21T08:51:03Z dg43tfdfdgfd