ऋतुराज गायकवाडची होणारी पत्नी नेमकी आहे तरी कोण? क्रिकेटशी आहे तिचं खास कनेक्शन

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२३ ने निरोप घेतला असून आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2023) चे वारे वाहू लागले आहेत. भारतीय संघ या आगामी चॅम्पियनशिपसाठी लंडनमध्ये पोहोचला आहे. पण याचदरम्यान आता टीम इंडियाच्या कॅम्पमधून लग्नाची बातमी आली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा स्टार सलामीवीर खेळाडू ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो जूनच्या पहिल्या आठवड्यातच लग्नबंधनात अडकणार आहे. पण ऋतुराज गायकवाडची ही होणारी तरी कोण, जाणून घेऊया.

कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार?

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल २०२३ चा चॅम्पियन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच त्याच्या त्याची भावी पत्नी उत्कर्षा पवारसोबत दिसला. या दोघांचा एमएस धोनीसोबतचा फोटोही समोर आला होता. फार कमी लोकांना माहित असेल की उत्कर्षा ही सुद्धा एक प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा (२३) ही पुण्याची राहणारी आहे. ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसोबतच ती वेगवान गोलंदाजही आहे.

उत्कर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ती २०१२-१३ आणि २०१७-१८ च्या हंगामात महाराष्ट्राच्या अंडर-19 संघात सहभागी झाली. तिची महाराष्ट्राच्या सिनियर संघातही निवड झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकवाड आणि उत्कर्षा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.

ऋतुराजने पहिल्यांदाच चेन्नईच्या विजयानंतर उत्कर्षा आणि धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं होतं की माझ्या आयुष्यातील VVIP's. यावरूनच नक्की झालं की ही ऋतुराजची होणारी बायको आहे.

गेल्या वर्षी एकदा ऋतुराज आणि उत्कर्ष एका जिममध्ये एकत्र दिसले होते पण तरीही त्याचसोबतची ही मिस्ट्री गर्ल कोण अशीच चर्चा सुरु होती. कारण उत्कर्षासोबत ऋतुराजचे फार फोटो नव्हते. ऋतुराजचे नाव एका मराठी अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे, मे २०२१ मध्ये, अभिनेत्री सायली संजीवसोबत त्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केलेल्या कमेंटमुळे दोघांमध्ये अफेयर सुरु असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या.

लग्नामुळे WTC साठी जाणार नाही

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात ऋतुराज गायकवाडचा स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. पण लग्नामुळे तो यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा खेळाडू यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे.

2023-06-01T06:36:38Z dg43tfdfdgfd