ऋषभ पंतवरील दुसऱ्या शस्त्रक्रियेआधी बहिणीची भावनिक पोस्ट

मुंबई, 16 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत त्याच्या अपघातानंतर सध्या प्रकृतीशी झुंज देत आहे. 30 डिसेंबरला पंतचा अपघात झाला होता या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 6 आठवडयांनी पुन्हा एकदा ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया केली जाणार अशी माहिती मिळत आहे. अशातच अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभची बहीण साक्षी पंत हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

पंतची बहीण साक्षी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. परंतु ऋषभच्या अपघातानंतर तीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर एकही पोस्ट शेअर केली नव्हती. मात्र अपघातानंतर तब्ब्ल 15 दिवसांनी तिने पोस्ट लिहिली आहे. यात तिने लिहिले, "मी देवाला प्रार्थना करते  की 2023 मध्ये माझ्या आणि माझ्या कुटुंबावरुन आशीर्वादाचा हात काढून नकोस". साक्षीच्या या पोस्टनंतर पंतचे चाहते तिला धीर देताना पहायला मिळत आहेत.

हे ही वाचा : २५ वर्षीय जगप्रसिद्ध महिला टेनिसपटू लग्नापूर्वीच बनणार आई

ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. बीसीसीआय पंतच्या आरोग्याबाबत दक्षता घेत असून त्याला योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या गुडघ्यामधील सर्व तीन लिगामेंटला दुखापत झाली आहे.

हे ही वाचा :पाकचा कर्णधार बाबर आझमचे सह खेळाडूच्या प्रेयसीशी अनैतिक संबंध; अश्लील व्हिडीओ व्हायरल

डॉक्टरांनी त्याच्या दोन लिगामेंटवर शस्त्रक्रिया केली आहे. आता त्याच्यावर तिसऱ्या लिगामेंटवर सहा आठवड्यात दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ऋषभ पंतचे मैदानावर परतणे हे तो दुखापतीतून कसा सावरतो याच्यावर अवलंबून आहे.

2023-01-16T13:03:54Z dg43tfdfdgfd