क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 231 कोटींचा फटका, भारत दौऱ्याआधी कर्णधारामुळे झालं नुकसान

सिडनी, 25 जानेवारी : ऑस्ट्रेलिया कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स भारत दौऱ्याआधी पुन्हा वादात अडकला आहे. कमिन्सवर आरोप आहे की, पर्यावरण संबंधी प्रकरणात त्याच्या प्रतिकूल विचारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 231 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. पॅट कमिन्सने त्याच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पॅट कमिन्सने स्पॉन्सर्सच्या जाहिरातीत भाग घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आर्थिक नुकसान सहन करावं लागल्याचं म्हटलं जात आहे.

सिडनी मॉर्निंग हेरॉल्डच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांच्यासोबत एक बैठक झाली होती. तेव्हा पॅट कमिन्सने एलिंटा एनर्जीसोबत राष्ट्रीय संघासोबत कराराबाबत चिंता व्यक्त केली होती. एलिंटा एनर्जीने त्यानंतर जून 2023 नंतर स्पॉन्सर कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला होता. कमिन्सने म्हटलं होतं की, मी ज्या पदावर आहे तिथे वेगवेगळ्या वादांमध्ये नेहमीच अडकतो.अशा आरोपांचा सामना करावाच लागेल. जे तुम्हाला ओळखत नाहीत ते तुमच्याबद्दल मत बनवतात.

हेही वाचा : WPL 2023 : महिला आयपीएलमध्ये 5 संघ, वाचा कुणी लावली सर्वाधिक बोली?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ हा तुफान फॉर्ममध्ये असून ऑस्ट्रेलियासाठी ही जमेची बाजू आहे. तो सध्या बीबीएलमध्ये फटकेबाजी करताना दिसत आहे.

2023-01-25T13:23:33Z dg43tfdfdgfd