बँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू AXAR PATEL च्या लग्नाचा VIDEO समोर

Axar Patel Wedding :  केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Axar Patel Married To Meha Patel :  टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मेहा पटेल (Meha Patel) यांचं लग्न मोठ्या थाट्यामाट्यात पार पडलं. अक्षर त्याचा होणाऱ्या नवरीला बँड बाजा वरात घोडा सोंग घ्यायला पोहचला. अक्षर आणि मेहा (Axar Patel Wife) यांचा संगीत समारोहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. आता सात फेरे घेतानाचा लग्न समारंभाचा  (Axar Patel Wedding)  व्हिडीओ समोर आला आहे. 

मैत्री, प्रेम आणि लग्न!

डायटिशियन आणि न्यूट्रिनिस्ट असलेल्या मेहासोबत मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतरनंतर प्रेमात झालं...आज या प्रेमाचं नातं लग्नबंधनात अडकलं. नववधू मेहा पांढऱअया रंगाचा लेहेंगामध्ये उठून दिसतं होती. तर आपल्या अक्षर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये एका राजकुमारासारखा दिसतं होता. (Axar Patel Meha Patel Wedding unseen trending video viral on social media)

अक्षर आणि मेहा यांचा विवाहसोहळा वडोदरामधील सेवासी कबीर फार्मवर संपन्न झाला. गुजराती रीतिरीवाजनुसार यांचं लग्न झालं. या सोहळ्या कुटुंबातील लोक आणि काही खास पाहुणे उपस्थित होते. सोशल मीडियावर यांचा लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. 

नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव 

अक्षरची पत्नी मेहा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर रील्सवर लाखोने व्ह्यूज मिळतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मेहाने तिच्या हातावर अक्षरच्या नावाचं टॅटू बनवला आहे. आज हे दोघे विवाहबंधनात अडकले असले तरी अक्षरने मेहाला 20 जानेवारीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 

दरम्यान लग्नामुळे अक्षय पटेलने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्याचा आतापर्यंत खेळ पाहिला तर अक्षर पटेलने टीम इंडियासाठी 8 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 40 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 47, 56 आणि 37 विकेट घेतल्या आहेत.  

2023-01-27T05:50:45Z dg43tfdfdgfd