ऐन सामन्यात सुरक्षा भेदत युवा चाहत्याने रोहितला मारली मिठी

मुंबई, 21 जानेवारी : रायपूर येथे शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना पारपडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला. यात भारतीय संघाने न्यूझीलंडला अक्षरशः धूळ चारली आणि मालिकेत 2-0 च्या आघाडीने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी सामना सुरु असताना रोहितचा एक चाहता मैदानात त्याच्या दिशेने धावत आला.

युवा चाहत्याने मैदानावरील सुरक्षा भेदत रोहितच्या दिशेने धाव घेतली, आणि त्याने रोहितला मिठीच मारली. रोहित शर्मा चाहत्याच्या या अचानक घेतलेल्या गळाभेटीमुळे चांगलाच बावरला होता. त्याचवेळी त्या युवा चाहत्याला रोहित पासून दूर करण्यासाठी सुरक्षा रक्षक धावत आला.  मात्र या दरम्यान रोहितने सुरक्षा रक्षकाला चाहत्याला काळजीपूर्वक हाताळत त्यावर कोणतीही कारवाई न करण्यास सांगितले.

रोहित शर्मा सोबत घडलेल्या रायपूर मधील या प्रसंगाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2023-01-21T13:51:06Z dg43tfdfdgfd