महिला IPLचे मीडिया राइट्स VIACOM18ने जिंकले, 951 कोटींची लावली बोली

 मुंबई, 16 जानेवारी : महिला आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क Viacom18 ने विकत घेतले आहेत. सोमवारी लिलावात पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांची बोली लावली. पाच वर्षात आयपीएलमध्ये होणाऱ्या सामन्यांची संख्या पाहता प्रत्येक सामन्यासाठी ७.०९ कोटी रुपये इतके असल्याचं सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी ट्विटरवरून याची माहिती दिली.

वायकॉम १८ ने प्रक्षेपणाचे हक्क ९५१ कोटी रुपये बोली लावून जिंकले आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी प्रत्येक सामन्यासाठी सरासरी ७.०९ कोटी रुपये इतके मूल्य असेल. महिला क्रिकेटसाठी ही बाब खूपच मोठी असल्याचंही जय शहा यांनी म्हटलं. तसंच महिला आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवल्याबद्दल जय शहा यांनी वायकॉम१८ चे अभिनंदन केलं.

2023-01-16T08:18:32Z dg43tfdfdgfd