चायनीज, पनीर अन् बरंच काही... टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये खायला काय असतं?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामना 21 जानेवारी रोजी रायपूर येथे पारपडत आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार असून या स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार आहे.

अशातच मॅचच्या एक दिवस आधी  युजवेंद्र चहलनं एक गमतीशीर व्हिडिओ तयार करून भारतीय टीमची रायपूर येथील ड्रेसिंग रूम दाखवली. एवढचं नाही, तर टीम इंडियाच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये काय काय समाविष्ट आहे? हेही त्यानं कॅमेऱ्यात दाखवलं.

हे ही वाचा : वनडे, टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत माहितीये?

यजुवेंद्र चहल रायपूरच्या स्टेडियमवरील टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची सफर प्रेक्षकांना व्हिडिओच्या माध्यमातून घडवत होता. यावेळी त्याने शेवटी टीम इंडियाच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये कोणते पदार्थ असतात हे दाखवले. क्रिकेटर्सचे ग्लॅमर्स आणि फिट आयुष्य पाहून अनेकांना नेहमी प्रश्न पडतो की हे खेळाडू त्यांच्या जेवणात नक्की काय खात असतील. याचा खुलासा चहल याने केला आहे.

चहल याने दाखवलेल्या व्हिडिओत टीम इंडियाच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये तंदूर नान, स्टीम राईस, जीरा राईस, दाल तडका, आलू जिरा भाजी, ग्रील व्हेजिटेबल, पनीरची भाजी, पास्ता, हाक्का नुडल्स, फ्राईड राईस इत्यादी पदार्थांचा समावेश होता.

2023-01-21T13:21:11Z dg43tfdfdgfd