भारतासाठी बॅडन्यूज, डोपिंगमध्ये अडकलेल्या प्रसिद्ध धावपटूवर घातली बंदी

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी एक मोठी बॅडन्यूज ठरली आहे. प्रसिद्ध स्टार महिला धावपटूवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अनिश्चित काळासाठी लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आधीच डोपिंगमुळे ही धावपटू वादात आली. तिची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे एशियन गेम्समध्ये खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता कायम आहे.

भारताची स्टार महिला अॅथलीट दुती चंद डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली. भारतीय ऑलिंपिक संघटनेने स्पर्धेतून तिला बाद केलं. याशिवाय तिच्यावर बंदी लावण्यात आली आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार उघड; उमेदवारांकडे सापडली डोपिंग इंजेक्शन्स; आयुष्य संपवेल एक चूक

देशाची सर्वात वेगवान महिला धावपटू दुती चंद ही आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ती 100 मीटर शर्यतीत विजेती ठरली आहे. इनडोअर गेम्समध्ये सर्वात वेगानं धावणाऱ्या महिलांमध्ये या धावपटूचं नाव पहिल्या 5 मध्ये घेतलं जातं. तिने 60 मीटर शर्यतीत 7.28 सेकंदात पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहे.

2023-01-18T10:19:21Z dg43tfdfdgfd