AFG VS UGA:अफगाणिस्तानाच्या सलामीवीरांची दमदार कामगिरी, युगांडा दिले इतक्या धावांचे लक्ष्य
मुंबई : टी- २० वर्ल्डकप आता चांगलाच रंगत असून पाचव्या सामन्यात अफगानिस्तान-युगांडा आमनेसामने आहेत. युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने १८३ धावा करत युगांडाला १८४ धावांचे लक्ष्य दिले आहे. अफगाणिस्तानकडून सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली परंतु युगांडाच्या गोलंदाजांनी शेवटीच काही षटकात खेळ केला.
सलामीवीरांची दमदार खेळी
प्रथम फलंदाजीला करत असताना अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान या सलामी जोडीने चांगलीच सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८८ चेंडूत १५४ धावांची भागीदारी केली पण, त्यानंतर संघाने एकापाठोपाठ बळी गमावल्या. रहमानउल्लाने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७६ धावा करत सर्वात मोठी खेळी खेळली तर, इब्राहिम झद्राननेबी ४६ चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या. अफगाणिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या परंतु शेवटच्या ६ षटकांत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना १ ही चौकार मारता आला नाही.
अफगाणिस्तानची फलंदाजी
अफगाणिस्तानच्या सालीमीवीरांच्या विकेट पडल्यानंतर विकेट्स पडण्याची मालिका सुरूच राहिली आणि १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नजीबुल्ला झद्रानच्या रूपाने संघाने तिसरी विकेट गमावली, जो केवळ २ धावा करू शकला. गुलबदिन नायबने केवळ ४ धावा बनवल्या आणि १८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो झाला. २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने संघाने पाचवी विकेट गमावली तर उमरझाईला केवळ धावा ५ करता आल्या. अफगाणिस्तानसाठी अखेरीस मोहम्मद नबीने १६ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला आणि राशिद खान १ चेंडूत २ धावा करून नाबाद राहिला.
युगांडाची गोलंदाजी
युगांडाकडून कॉस्मास क्युवुता आणि कर्णधार ब्रायन मसाबाने प्रत्येकी २ बळी घेतले. केव्हुताने ४ षटकात २५ धावा दिल्या तर मसाबाने ४ षटकात केवळ २१ धावा दिल्या. अल्पेश रामजानी ४ षटकात ३३ धावा देऊन १ बळी काढला. अशाच अधिक
बातम्या वाचण्यासाठी भेट द्या
महाराष्ट्र टाइम्सला.
ताज्या बातम्या,
शहर,
देश,
अर्थ,
क्रीडा,
भविष्य आणि
लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा.
व्हिडिओ पाहण्यासाठी
मराठी TimesXP ला भेट द्या.
2024-06-04T03:36:52Z dg43tfdfdgfd