AKASH MADHWAL: आकाश मढवाल कसा काय 'यॉर्कर किंग' झाला? गुरू वसीम जाफरने सांगितली रियल स्टोरी

चेन्नई: आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात कोणी विचार देखील केला नसेल लखनौ सुपर जायंटसचा असा दारुण पराभव होईल. पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने ही लढत ८१ धावांनी जिंकली आणि क्वॉलिफायर २ मध्ये प्रवेश केला. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरलो तो २९ वर्षीय आकाश मढवाल होय.

आकाशच्या गोलंदाजीने लखनौचे कंबरडे मोडले, त्याच्या अविश्वसनीय कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. आकाशने गेल्या ३ सामन्यात १२ विकेट मिळून दिल्या, ज्यामुळे मुंबईचा संघ प्लऑफ आणि आता क्वॉलिफायर २ मध्ये पोहोचला. लखनौ विरुद्ध त्याने ३.३ षटकात ५ धावा देत ५ विकेट घेतल्या. प्रत्येक जण आकाशचे कौतुक करत असताना टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफर यांनी आकाश बद्दल अशी एक गोष्ट सांगितली, ज्याबद्दल कोणालाच माहिती नाही.

जाफर सोशल मीडियावर सक्रिय असतो. इस्टाग्रामवर त्याने आकाश मधवाल एक फोटो शेअर केल आणि त्याच्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली. जाफरने आकाश बाबतचा एक किस्सा सांगितला. मी जेव्हा उत्तराखंडचा मुख्य कोच होतो तेव्हा हा मुलगा ट्रायलसाठी आला होता. तो २४-२५ वर्षाचा असेल आणि त्याने फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळले होते. त्याच्या वेगाने आम्ही प्रभावीत झालो आणि आम्ही तातडीने त्याला संघात घेतले. ते वर्ष होते २०१९ आणि नाव होते आकाश मढवाल होय. मला गर्व वाटतो की तो इतका पुढे आला.

आकाशला आयपीएल २०२३च्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना संघात घेतले होते. गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यानंतर मुंबईने त्याला मुख्य संघात घेतले. अर्थात गेल्या वर्षी त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. पण या व्रषी आकाशने मुंबईकडून पदार्पण केले.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या संधीचे आकाशने सोनं केले आणि खळबळ उडवून दिली. आकाशने एका पाठोपाठ एक प्रत्येक मॅचमध्ये घातक गोलंदाजी केली आणि सर्वांना प्रभावीत केले. एलिमिनेटर लढतीत तर त्याने सनसनाटी गोलंदाजी केली. २१ चेंडूत ५ धावा आणि ५ विकेट घेत अनेक विक्रम केले. भविष्यात आकाश मुंबईचा मुख्य गोलंदाज होऊ शकतो. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ७ सामन्यात १३ विकेट आहेत.

2023-05-25T11:34:00Z dg43tfdfdgfd