AUS PLAYING 11: अफगाणिस्तानने दिलेल्या जखमांमुळे ऑस्ट्रेलिया बनला 'घातक', भारताविरुद्ध म्यानातून काढणार खतरनाक 'हत्यार'

सेंट लुसिया : सुपर-8 च्या ग्रुप फेरीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा सामना डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी कॅरिबियन बेटांमधील इतर मैदानांपेक्षा थोडी वेगळी आहे. साधारणपणे येथे चेंडू बॅटवर येतो, ही ऑस्ट्रेलियन संघासाठी काहीशी दिलासा देणारी बाब ठरावी. सेंट व्हिन्सेंटच्या सुपर स्लो ट्रॅकवर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कांगारूंना खूप त्रास दिला होता. अफगाणिस्तानविरुद्ध मिचेल स्टार्कला वगळून ऑस्ट्रेलियाने डावखुरा फिरकीपटू ॲश्टन अगरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. अगर अत्यंत किफायतशीर (0/17) असला तरी, अफगाणिस्तान विरोधात पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची स्टार्कची क्षमतेचा उपयोग करण्यात कमी पडल्याचे नाकारता येणार नाही. जाणून घेऊया या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची रणनीती काय असू शकते?

भारताविरुद्ध ही चूक करणार नाही

या मोठ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ स्टार्कला परत आणू शकतो. जरी सेंट लुसिया येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये फिरकीपटूंचा सरासरी इकॉनॉमी रेट 7.9 आहे, जो वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत (9.4) खूप चांगला आहे, परंतु कर्णधार मिचेल मार्शला माहित आहे की जर त्याला भारताविरुद्ध जिंकायचे असेल तर त्याच्याकडे असलेली घातक हत्यारे वापरावी लागतील. ट्रॅव्हिस हेड गेल्या सामन्यात शुन्यावर क्लीन बोल्ड झाला, पण भारताविरुद्धचा त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. डेव्हिड वॉर्नर हा मोठा सामनावीर आहे. त्याला भारताविरुद्ध खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. मार्कस स्टॉइनिस चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मॅक्सवेल, मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिड यांच्यावर मधल्या फळीची आणि फिनिशिंगची जबाबदारी असेल. स्टार्कला पॅट कमिन्स आणि हेजलवूड या जोडीची साथ मिळेल. ॲडम झाम्पा फिरकीमध्ये जाळे विणताना दिसतो आहे.

Box office. 12.30am AEST tonight.

Full preview of Australia's #T20WorldCup Super Eight crunch clash with India: https://t.co/6JNuvJIHeW pic.twitter.com/D2ot2hvJl7

— cricket.com.au (@cricketcomau) June 24, 2024 ]]>

स्टार्कचा आवडते शिकार भारतीय फलंदाज

मिचेल स्टार्कने भारताविरुद्ध टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी असे एकूण ४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत, 4.11 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह 83 विकेट्स घेतल्या आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये, मिचेल स्टार्कने शुभमन गिल, केएल राहुलसह तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, जे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले. स्टार्क हा मोठा सामनावीर आहे. आयपीएल 2024 च्या गट सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सरासरी होती, परंतु प्लेऑफ आणि फायनलमध्ये त्याने आपल्या संघासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, पॅट कमिन्स, मिचेल मार्श, जोश हेझलवूड, ॲडम झम्पा.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-24T10:07:52Z dg43tfdfdgfd