AXAR PATEL WEDDING: अक्षर पटेल-मेहा अडकले लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली वरात... पाहा VIDEO

टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलचा विवाह सोहळा संपन्न, गुजरातच्या वडोदरामध्ये पारंपारिक पद्धतीने हा सोहळा पार पडला

Axar Patel Wedding: भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलचा (KL Rahul) नुकताच विवाह पार पडला. 23 जानेवारीला केएल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्नगाठ बांधली (KL Rahul-Athiya Shetty Wedding). त्यानंतर आता टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलही (Axar Patel) लग्नबंधनात अडकला आहे. गुजरातमधल्या (Gujrat) वडोदरा इथे अक्षर पटेलचा विवाह सोहळा पार पडला. अक्षरच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आला आहे. 

वरातीचा व्हिडिओ व्हायरल

अक्षर पटेलच्या वरातीचा हा व्हिडिओ आहे. अक्षरच्या लग्नाची मोठ्या धुमधडाक्यात वरात निघाली, यात त्याचं कुटुंब आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते. बँडबाजाच्या तालावर वराती नाचताना या व्हिडिओत दिसत आहेत. नवरदेव अक्षर कारमध्ये बसलेला या व्हिडिओत पाहिला मिळतोय. या सोहळ्यात क्रिकेटर जयदेव उनाडकटही सहभागी झाला होता. अक्षर पटेलचं लग्न त्याची मैत्रीण मेहा पटेलशी (Meha Patel) झालं. लग्नाआधी मेहंदी कार्यक्रमातील मेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अक्षर आणि मेहाने केला डान्स

जयदेव उनाडकटने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. अक्षर आणि मेहाने संगीत सेरेमनीमध्ये सुंदर डान्स केला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षर पटेल आणि मेहाच्या हळदी कार्यक्रमाचे फोटोही शेअर करण्यात आले होते. यात दोघांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. 

मेहा पटेल आहारतज्ज्ञ

मेहा पटेल ही व्यवसायाने डायटीशियन (Dietician) आणि न्यूट्रिशियनिस्ट (Nutritionist) आहे. तसंच तिला ट्रॅव्हलिंगची (Traveller) आवड आहे. सोशल मीडियावर (Social Media) आपल्या ट्रॅव्हिलिंगचे अनेक फोटो ती शेअर करते. मेहाने आपल्या हातावर अक्षरच्या नावाचा टॅटू कोरला आहे. मेहाच्या 28 व्या वाढदिवशी अक्षर पटेलने तिला प्रपोज केलं होतं. यानंतर दोघांचा साखरपुडाही पार पडला. साखरपुड्याचे फोटो अक्षरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. 

अक्षर पटेलने घेतला ब्रेक

अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यात अक्षरने दमदार कामगिरी केली. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. पण या मालिकेतून अक्षर पटेलने लग्नासाठी ब्रेक घेतलाय. 

2023-01-26T15:20:26Z dg43tfdfdgfd