AXAR PATEL WEDDING: बॅटरला नाचवणारा अक्षर आज स्वत:च्या लग्नात बेधुंद नाचला; पाहा इनसाईड VIDEO

Axar Patel Weds Meha Patel: अक्षर पटेलने संगीत सोहळ्यासाठी (Sangeet) फिकट क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याची होणारी पत्नी मेहा हिने गुलाबी रंगाची घागरा चोली घातली होती. 

Axar Patel Marriage Video: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मेहा पटेल (Meha Patel) यांचा लग्न सोहळा संपन्न होत आहे. काल रात्री संगीताचा कार्यक्रमही पार पडला. अक्षर पटेल आणि मेहा (Axar Patel Wife) बेधुंद नाचताना दिसले. त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Axar Patel Marriage Video) झाले आहेत. 

अक्षर आणि मेहा यांचा मेहंदीचा कार्यक्रम 25 जानेवारी रोजी पार पडला. गुजराती रीतिरिवाजानुसार वडोदरा इथं त्यांचं लग्न (Axar Patel Weds Meha Patel) झालं. अक्षर आणि मेहा हे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. आधी मैत्री आणि नंतर त्यांचं प्रेमात रूपांतर झालं. मेहा ही डायटिशियन आणि न्यूट्रिनिस्ट आहे. दोघांनी (Axar Patel Wedding) अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Axar Patel Wedding Axar danced with Meha Patel on tu man meri jah song Watch Inside Video)

आणखी वाचा - Axar Patel Wedding: अक्षर पटेल-मेहा अडकले लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली वरात... पाहा Video

अक्षर पटेलने फिल्मी स्टाइलमध्ये वाढदिवशी तिला प्रपोज केलं होतं. दोघांनी 20 जानेवारी 2022 ला साखरपुडा (Engagement) केला होता. त्यानंतर आता दोघांचा लग्न सोहळा थाटामाट पार पडला. अशातच सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये अक्षर 'तु मान मेरी जाँ', या प्रसिद्ध गाण्यावर डान्स (Axar danced with Meha Patel) करताना दिसत आहेत.

पाहा Video -

दरम्यान, अक्षर पटेलने संगीत सोहळ्यासाठी (Sangeet) फिकट क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याची होणारी पत्नी मेहा हिने गुलाबी रंगाची घागरा चोली घातली होती. मित्र परिवार कुटुबियांसमोर दोघांनी स्टेजवर आग लावल्याचं पहायला मिळालं. भल्या भल्या क्रिकेटर्सला फिरकीच्या जाळ्यात अडवणारा अक्षर आता स्वत: लग्नाच्या जाळ्यात अडकला आहे.

2023-01-26T18:50:32Z dg43tfdfdgfd