CRICKETER RETIRES: ट्रिपल सेंच्युरी ठोकणाऱ्या 'या' बड्या खेळाडूचा क्रिकेटला रामराम; वर्ल्ड कपआधी अचानक केली घोषणा!

Hashim Amla Announces His Retirement: आगामी वर्ल्ड कपपूर्वी बड्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात एकच चर्चा होताना दिसते.

Hashim Amla Retirement: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा (South Africa Cricket Team) माजी दिग्गज कर्णधार हाशिम आमला (Hashim Amla) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली आहे. आमलाने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा होती, तरीही तो सरेसह (surrey) इंग्लिश काउंटी सर्किटवर सक्रिय होता. आमलाने 2022 मध्ये सरेला काउंटी चॅम्पियनशिपचा मुकुट मिळवून दिला. त्यानंतर आता आमलाने अधिकृतरित्या घोषणा केली आहे. (Hashim Amla Announces His Retirement From All Forms Of Cricket latest marathi news)

काय म्हणाला Hashim Amla? 

निवृत्ती घेतल्यानंतर हाशिमने सांगितले की, "माझ्याकडे ओव्हल मैदानाच्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि एक खेळाडू म्हणून मी ते सोडल्याबद्दल खूप अवघड आहे. एलेक स्टीवर्ट आणि सर्व कर्मचारी आणि खेळाडू आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. यामध्ये कोणत्याही खेळाडूचा सहभाग असणे हा सन्मान आहे."

2023-01-18T15:00:45Z dg43tfdfdgfd