DAVID WARNER RETIREMENT : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

David Warner Retirement in Test cricket : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Test retirement) घोषणा केली आहे. आयसीसीने (ICC) अधिकृत वेबसाइटवरून याची माहिती देण्यात आली आहे. जानेवारी  2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार असल्याचं सांगण्यात आलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला (WTC Final 2023) 4 दिवस बाकी असताना वॉर्नरने ही घोषणा केली आहे.

मी नेहमी म्हणत आलोय की, 2024 चा टी-20 वर्ल्ड कप माझ्या करिअरचा शेवट होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) आणि ऍशेस मालिकेनंतर (Ashes series 2023) पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत मी शेवटच्या वेळी खेळणार आहे, असं वॉर्नरने म्हटलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंडमधील बेकनहम येथे सराव करतोय. त्यावेळी वॉर्नरने देखील नेटमध्ये कसून सराव केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वॉर्नरने आपल्या निवृत्तीचा प्लॅन सांगितला. मी कसोटी टेस्टमध्ये धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियात खेळत राहिलो तर मी नक्कीच वेस्ट इंडीज विरूद्धची मालिका खेळणार नाही, असंही वॉर्नर म्हणाला आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर ताशेरे

येत्या 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सामना इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी सिडनी हेराल्डला दिलेल्या एका मुलाखतीत वॉर्नरने ऑस्ट्रेलिया बोर्डावर ताशेरे ओढले. त्याच्या कर्णधारपदाबाबत घेतलेल्या भूमीकेवरून नाराजी व्यक्त केली. माझ्या कर्णधारपदावर बंदी प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं ते अपमानास्पद होतं, असं म्हणत वॉर्नरने नाराजी व्यक्त करून दाखवली होती.

डेव्हिड वॉर्नरची कसोटी कारकीर्द

वॉर्नरने आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 8 हजार 158 धावा केल्या आहेत. वॉर्नरने या दरम्यान 3 द्विशतकं तर 25 शतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर 34 अर्धशतकं ठोकली आहेत. वॉर्नरने एक त्रिशतक झळकावलं आहे. 335 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

2023-06-03T11:21:25Z dg43tfdfdgfd