HARDIK PANDYA: IPL​ 2025 पूर्वी मुंबईच्या ताफ्यात लगबग, MI निर्णयावर ठाम, रोहितबाबत काय निर्णय घेणार याची उत्कंठा

मुंबई: आयपीएल 2025च्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद कोण सांभाळणार यावरुन अनेकदा बऱ्याच चर्चा रंगल्या. मागील वर्षी कर्णधारपद रोहितकडून काढून घेऊन हार्दिकला देण्यात आले आणि तिथूनच चर्चा रंगली की रोहिल आणि हार्दिकमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हार्दिकच्या कर्णधारापदाखाली मुंबईला विशेष कामगिरी करता आली नाही त्यामुळे हार्दिककडून कर्णधारपद काढून घेतले जाईल अश्या चर्चाना उधाण आले आहे. आता मुंबईचा आयपीएल 2025च्या हंगामासाठी कर्णधार कोण याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सांभाळायला देणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांकडून असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. जर हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय एका तरुण, गतिमान कर्णधाराने गुजरात टायटन्ससोबत आधीच आपली क्षमता सिद्ध केलेल्या संघाच्या नेतृत्वाला नवसंजीवनी देण्याची एमआयची रणनीती प्रतिबिंबित करते.

❗️ Breaking News ❗️

Hardik Pandya Will Remain Our Captain, There Will Be No Change - Mumbai Indians pic.twitter.com/uNKyEqgGru

— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) September 2, 2024 ]]>

हार्दिक त्याच्या अष्टपैलू क्षमतेसाठी ओळखला जातो तर त्याचे नेतृत्व कदाचित अधिक आक्रमक फलंदाजी आणि लवचिक गोलंदाजी बदलांकडे झुकून, अधिक गतिमान दृष्टिकोनाला प्रोत्साहन देईल. याचा अर्थ असाही होऊ शकतो की तरुणाईवर नवीन लक्ष केंद्रित करणे, अनुभवी खेळाडूंच्या बरोबरीने नवीन कलागुणांना वाव देणे. आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माकडून हार्दिककडे झालेले संक्रमण हे नेतृत्व बदलापेक्षा अधिक आहे.

कदाचित हे कर्णघारपदाची धुरा सूर्याकुमार यादवच्या खांद्यावरही पडू शकते. सूर्या सध्या भारताच्या T20 संघाची समान सांभाळत असल्याने आणि मुंबई इंडियन्सचा अनुभवी खेळाडूही असल्याने ही जबाबदारी सूर्याकडे दिली जाऊ शकते. रोहित मात्र, मुंबई संघात कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे. रोहित मुंबई सोडणार याचर्चेला उधाण आले होते कारण आलपाएल 2024 च्या हंगामातील एक व्हायरल व्हिडीओनंतर ही चर्चा रंगली होती. या व्हिडीओत रोेहित हे बोलताना ऐकू येत आहे की, हे माझं शेवटचं आहे भावा" त्यामुळे नक्की काय निर्णय होइल यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-04T08:04:47Z dg43tfdfdgfd