ICC च्या कारवाईमुळे श्रीलंकेचा पत्ता कट! भारताला लागणार यजमानपदाची लॉटरी?

 Womens Champions Trophy 2027 : 30 ऑगस्ट रोजी आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला धक्का देत त्यांच्याकडून आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीस यांच्यात सुरु असलेल्या प्रशासकीय वादामुळे श्रीलंका क्रिकेटला याच नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र हे पहिल्यांदाच झालेलं नाही तर 2023-24 मध्ये सुद्धा श्रीलंका क्रिकेटमधील राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आयसीसीने काही महिन्यांसाठी सस्पेंड केलं होतं. सरकार आणि क्रिकेट बोर्डामध्ये मागील काही महिन्यांपासून वाद आहेत. श्रीलंकेकडून यापूर्वी 2024 पुरुष अंडर 19 संघाचं यजमानपद काढून घेण्यात आलं होत त्यानंतर आता आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद सुद्धा त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे. मात्र श्रीलंकेचा पत्ता कट झाल्यावर आता महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाची लॉटरी भारताला लागण्याची शक्यता आहे. 

श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयने का केली कारवाई? 

श्रीलंका क्रिकेट बोर्ड हे सध्या सरकारच्या वतीने नियुक्त करण्यात आलेली रूपांतरण समितीच्या अंतर्गत कार्यरत आहे. ही प्रशासकीय रचना ही आयसीसीने दिलेल्या नियमांना धरून नाही. आयसीसीच्या नियमांनुसार त्यांच्या सर्व सदस्य देशांच्या क्रिकेट मंडळांनी कोणत्याही प्रकारच्या सरकारी हस्तकक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे कामकाज चालवले पाहिजे. त्यामुळेच आयसीसीने सदर कारवाई केली असून श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 कडून काढून घेण्यात आलं आहे. 

हेही वाचा : IPL मधील 'इम्पॅक्ट प्लेअर' नियम हटवला जाणार? BCCI ने सर्व 10 संघांशी साधला संपर्क

 

भारताला लागणार महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाची लॉटरी? 

सरकारच्या क्रिकेट बोर्डातील हस्तकक्षेपामुळे श्रीलंका क्रिकेटकडून आयसीसीने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतल्यावर आता या स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करता येणार याविषयी विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 मध्ये एकूण 6 संघांचा सहभाग असणार आहे. यापैकी स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताचं नाव आघाडीवर आहे. भारताने आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चं यशस्वीपणे आयोजन भारतात केलं होतं एवढंच नाही तर भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव सुद्धा कोरलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाची संधी येऊ शकते. आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान रंगणार आहेत. 

2026-08-31T09:39:33Z