ICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!

ICC Men's ODI Player of the Year: यंदाचा हा पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे.

ICC Men's ODI Cricketer of the Year, Babar Azam: दरवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा करत असते. यंदा देखील ICC ने पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू ऑफ द ईयरचं नाव नुकतंच जाहीर झालं आहे. मागील वर्ष 2022 चा खेळ पाहता आयसीसीने खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे. यावर्षी देखील हा पुरस्कार विराट (Virat) आणि रोहितचा (Rohit) पदरी पडला नाही. तर रोहित आणि विराटच्या दुश्मन खेळाडूला हा पुरस्कार मिळाला आहे. (Babar Azam Crowned as ICC Men's ODI Player of the Year 2022 latest sports news)

यंदाचा हा ICC Men's ODI Cricketer of the Year पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam).

पाहा ट्विट - 

बाबरची 2022 मधील कामगिरी -

गतवर्षीही बाबर आझमची (Babar Azam) वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर या वर्षी देखील त्याने हा किर्तिमान मिळवला आहे. बाबर आझमने (Babar Azam 2022) 2022 मध्ये 9 सामन्यांमध्ये 84.87 च्या सरासरीने 679 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 3 एकदिवसीय शतकं (Babar Azam Century) झळकावली आहेत. 

आणखी वाचा - Virat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला 'सारा भाभी' आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही...; VIDEO व्हायरल

दरम्यान, या शानदार खेळामुळे तो यंदाच्या क्रिकेटर ऑफ द ईयरचा मानकरी ठरला आहे. बाबर आझम हा एकदिवसीय सामन्यातील क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार सलग दोनदा जिंकणारा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याआधी विराट कोहली (Virat Kohli), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) , एबी डिव्हिलिअर्स (AB de Villiers) यांच्या नावाचा समावेश आहे.

2023-01-26T09:50:20Z dg43tfdfdgfd