IND VS ENG: त्या एका षटकाने सामना फिरवला, गिलची मोठी चूक अन् इंग्लंडने ३०० धावांचा टप्पा कसा गाठला, पाहा...
![]()
बर्मिंगहम: भारताने इंग्लंडची ५ बाद ८४ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारत इंग्लंडला २५० धावांत तरी ऑल आऊट करू शकतो, असे वाटत होते. पण त्यानंतर इंग्लंडने एकही विकेट गमावली नाही आणि त्यांनी चक्क तिनशे धावांचा टप्पा गाठला. शुभमन गिलच्या एका चुकीमुळे ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिलच्या एका चुकीचा भारतीय संघाला यावेळी मोठा फटका बसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कोणत्या एका षटकात सामना फिरला, पाहा...
ही गोष्ट घडली ती ३२ व्या षटकात. त्यावेळी इंग्लंडचा जेमी स्मिथ फलंदाजी करत होता. इंग्लंडला त्यावेळी धावांची गरज होती. स्मिथ आणि हॅरी ब्रुक्स हे धावा जमवत स्थिरस्थावर झाले होते आणि त्यांना ज्या षटकाची गरज होती, ते त्यांना मिळाले. हे ३२ वे षटक टाकत होता तो भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही. पण त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र स्मिथने चौकार लगावला, स्मिथ फक्त त्यावर थांबला नाही. कारण स्मिथने त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर थेट षटकार लागवला. स्मिथ त्यावेळी चांगल्या लयीत आला होता. त्या़नंतर स्मिथने उर्वरीत तीन चेंडूवर तीन चौकार वसूल केले. यामध्ये प्रसिधने एक वाईड बॉलही टाकला. त्यामुळे प्रसिधच्या या एका षटकात इंग्लंडला तब्बल २३ धावा काढत्या आल्या आणि या एका षटकामुळे सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.
![]()
शुभमन गिलकडून कोणती मोठी चूक घडली...
प्रसिध कृष्णाला शुभमन गिलने गोलंदाजीला आणले होते खरे. पण प्रसिधला चांगली लय सापडली नव्हती, त्याच्या चेंडूला वेग नव्हता. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू त्याच्या गोलंदाजीवर सहजपणे धावा घेत होते. त्यामुळे गिलने प्रसिधला हे षटक द्यायलाच नको होते, पण गिलने गोलंदाज बदलला नाही आणि मोठी चूक केली. या चुकीचा भारतीय संघाला किती मोठा फटका बसला, हे सर्वांनाच पाहायला मिळाले. कारण या षटकातनंतर इंग्लंडचे खेळाडू भारताच्या गोलंदाजीची धुलाई करायला लागले आणि तिथेच हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.
शुभमन गिलने नेतृत्व करताना यावेळी ही सर्वात मोठी चूक केली आणि ती भारताला चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने त्यामुळे ५ बाद ८४ वरून थेट तिनशे धावांचा पल्ला पार केला. या एका षटकामुळे सामन्यात मोठा फरक पडल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
2025-07-04T14:08:27Z